एलपीजी गॅस ग्राहकास महत्त्वपूर्ण माहिती | Important Information of LPG Gas

एलपीजी गॅस ग्राहकास महत्त्वपूर्ण माहिती | Important Information of LPG Gas

महत्त्वपुर्ण सुचना प्रत्येक गॅस वितरण एजन्सिंला
पावतीप्रमाणेच पैसे द्यावे.कारण त्याच पैशात सव्वीस रूपये पन्नास पैसे डिलीव्हरी चार्जेस असतात.
तक्रार करायची असल्यास जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे करावी… थेट घरपोच गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये – जिल्हाधिकारी
कुठल्या ना कुठल्या जिल्हयात कार्यरत भारत पेट्रोल कॉपॉरशन, हिंदुस्तान पेट्रोल कार्पोरेशन, इंडियन ऑईल कार्पोरेशन या कंपन्यांच्या वितरकाव्दारे गॅस वितरण चालू असते. ऑईल अँड नॅचरल गॅस तर्फे सर्व कंपन्यांना पूढील प्रमाणे दर देण्यात आले आहे. घरगुती वापराच्या 14.2 किलो प्रति गॅस सिलेंडरसाठी संबंधित गॅस एजन्सीला 65.00 रु.एवढे कमिशन मंजूर केलेले आहे. त्यात त्या संबंधित गॅस

गोडावून मधून गॅस सिलेंडर घेतला किंवा खरेदी केला जात असेल तर गॅस एजन्सीने 14.2 किलोच्या गॅस सिलेंडर साठी 29 रु. आणि 5 किलो साठी 14 रुपये 50 पैसे असे डिलेव्हरी चार्जेस आकारु नये. संबंधित गॅस वितरकांच्या कार्य क्षेत्राबाहेरील ग्राहक असल्यास त्यांनी ते स्वत:हून त्यांच्या सिमा क्षेत्राबाहेरील दुसऱ्या नजीकच्या गॅस वितरकांकडे ग्राहकांना जोडावे. जेणेकरुन ग्राहकांना वाहतुकीच्या खर्चाचा भूर्दंड पडणार नाही. जिल्हयातील सर्व गॅस ग्राहकांना किरकोळ विक्री किंमत (RSP) दराव्यतिरिक्त कोणताच अतिरिक्त चार्ज लावू नये. तसेच संबंधित गॅस वितरकांनी गॅस सिलेंडरची विक्री (RSP) दरातच विक्री करणे बंधनकारक आहे.

जिल्हयातील ग्रामीण भागातील कोणत्याही गॅस वितरकांनी पेट्रोलियम मंत्रालयाकडून वेळोवेळी घोषित होणाऱ्या सेल रिटेल किमतीप्रमाणे गॅस सिलेंडरची विक्री करणे बंधनकारक आहे. कोणत्याही गॅस वितरकांनी त्यांना ठरवून दिलेल्या RSP किंमतीपेक्षा जास्त दरोन गॅस सिलेंडरची विक्री केल्याची तक्रार असल्यास संबंधित तालुक्याचे तहसिल कार्यालयातील पुरवठा विभाग तसेच जिल्हा पुरवठा कार्यालय, येथे लेखी तक्रार करावी. या तक्रारीमध्ये चौकशी अंती तथ्य आढळल्यास व ते निष्पन्न झाल्यास त्याच्याविरुध्द जीवनावश्यक वस्तू कायदयातील तरतुदींच्या अनूषंगाने कारवाई करण्यात येईल.

या वाहतूकीचे अंतर नुसार वाहतूकीचे दर देण्यात आलेले होते ते दर आता रद्द करण्यात येत आहे. तसेच शहरी भागात अनाधिकृतपणे अतिरिक्त घेण्यात येणार 10 रुपये दर कोणीही आकारु नयेत व ग्राकांनी देखील असे अतिरिक्त पैसे देवू नयेत. तेसच गॅसधारक ग्राहकांनी कॅश मेमोची पावती घेवूनच सिलेंडर खरेदी करावे असे ही प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

<

Related posts

Leave a Comment