लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती – Annabhau Sathe Information in Marathi

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती – Annabhau Sathe Information in Marathi

महाराष्ट्राला थोर समाजसुधारक, विचारवंत, कवी, संत, साहित्यिक अशी परंपरा लाभली आहे. लोकमान्य टिळक, वि.दा. सावरकर, संत तुकाराम अशी अनेक रत्ने आपल्या महाराष्ट्रात जन्माला आली आहेत. यांतील प्रत्येकाने आपली वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. परंतु अशी कुठली व्यक्ती आहे जी या सर्व उपाध्या धारण करू शकते? कुठली एक अशी व्यक्ती आहे जिने या सर्व क्षेत्रांत आपले अमूल्य योगदान दिले आहे? या प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे अण्णाभाऊ साठे
“जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव” समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य त्यांच्या साहित्यातून घडले. उपेक्षित समाजातील जनमानसाचा आवाज उठवण्याचे काम त्यांच्या लेखनीतून झाले. आपल्या अजरामर साहित्यिक कृतीतून त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती – Annabhau Sathe Information in Marathi
Annabhau Sathe Information in Marathi


नाव (Name) – तुकाराम भाऊराव साठे (Tukaram Bhaurao Sathe)
जन्म (Birth) – १ ऑगस्ट १९२० (1st August 1920)
टोपण नाव (Nick Name) अण्णाभाऊ (Annabhau)
जन्मस्थान(Birth Place) वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली (Vategaon, Tq. Valva, Dist. Sangali)
वडील (Father Name) भाऊराव (Bhaurao)
आई (Mother Name) वालबाई (Valbai)
शिक्षण (Education) अशिक्षित (Uneducated)
पत्नी (Wife Name) कोंडाबाई आणि जयवंताबाई (Kondabai and Jayvantabai)
मृत्यु (Death) १८ जुलै १९६९ (18th July 1969)
अण्णाभाऊ साठे यांचा इतिहास – Annabhau Sathe Family & History in Marathi
१ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे उपेक्षित समजल्या जाणाऱ्या मातंग समाजात अण्णाभाऊ यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालबाई असे होते. त्यांच्या बहिणीचे नाव जाईबाई असून भावाचे नाव शंकर भाऊ साठे असे आहे. अण्णाभाऊ यांनी दोन विवाह केले.त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई तर दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंता असे होते. त्यांना एकूण तीन अपत्ये असून त्यांची नावे मधुकर, शांता आणि शकुंतला अशी आहेत. अण्णाभाऊ यांचे मूळ नाव तसे तुकाराम परंतु संपूर्ण जग त्यांना अण्णाभाऊ या टोपणनावानेच ओळखते. भाऊंचे शिक्षण तसे झालेले नव्हते, परंतु तरीही कठोर प्रयत्नांतून त्यांनी अक्षरज्ञान प्राप्त केले.

अण्णाभाऊ साठे यांची माहिती – Annabhau Sathe Mahiti
मोजकेच शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ लहानपणीच आपल्या वडिलांसोबत मुंबई येथे आले. मुंबईला अंगावर पडेल ते काम त्यांनी केले. गिरणीमध्ये झाडूवाल्याची नोकरी पासून ते कोळसे वेचण्यापर्यंत सर्व कामे त्यांनी केली.
“गरिबीने ताटतुट केली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधाबांध झाली भाकर तुकड्याची”
या कवितेतून त्यांनी आपला मुंबई प्रवासाचा अनुभव व्यक्त केलेला दिसतो.

अण्णाभाऊ साठे मराठी साहित्य लेखन – Annabhau Sathe Books
अण्णाभाऊ यांनी आपल्या जीवनकाळात विविधांगी लेखन केले. त्यांनी जवळपास २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णन, कथा, कविता, गीते इ. क्षेत्रांत त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले. अन्नाभाऊंच्या साहित्यात समाजातील वैर नष्ट करण्याचे सामर्थ्य आपल्याला दिसून येते. त्यांनी तत्कालीन सामाजिक पस्थितीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम केले.
तमाशाला सांस्कृतिक वारसा मिळवून देण्याचे श्रेय भाऊंना जाते. तमाशात काम करताना स्त्रियांचे होणारे शोषण या विषयावरील त्यांची ‘वैजयंता’ हि कादंबरी, तर भीषण दुष्काळात ब्रिटीशांचे खजिने व धान्य गोदाम लुटून गोरगरिबांना व श्रमिकांना वाटणाऱ्या तरुणाची कथा सांगणारी ‘फकीरा’ ह्या त्यांचा काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत.

त्यांच्या ‘फकीरा’ या कादंबरीला १९६१ सालचा राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळालेला आहे. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक यांच्या वेदना जाणून घेऊन त्यांवर केलेले लेखन हे अण्णाभाऊ यांची विशेषता. शिवाय ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी त्यांना कळेल अशा भाषेत त्यांनी पोवाडे, लावण्या व गीते लिहिली.
अण्णाभाऊ साठे यांच्या काही खास कविता – Annabhau Sathe Marathi Kavita & Powada
“माझी मैना गावावर राहिली,
माझ्या जीवाची होतीया काहिली”
“दौलतीच्या राजा उठून सर्जा हाक
दे शेजाऱ्याला, रे शिवारी चला”
“रवी आला लावूनी तुरा,
निघाली जिंदगी भरभरा
दीप गगनाच्या डोईवर लागला,
ढग तिमिराचा त्यानं
निवारिला झाले आकाश लाल,
बघ उधळी गुलाल रानारानात हर्ष पसरला,
आला बहार गुलमोहरा”
“एकजुटीचा नेता झाला कामगार तैय्यार बदल्या रे
दुनिया सारी दुमदुमली ललकार”
या अण्णाभाऊंच्या काही प्रसिद्ध मराठी कविता. तर मुंबईचे वर्णन करताना ते लिहतात,
“मुंबईत उंचावरी, मलबार हिल इंद्रपुरी कुबेराची वस्ती
तिथं सुख भोगती परळात राहणारे,
रात दिवस राबणारे मिळेल ते खाऊन घाम गळती”
“मुंबई नागरी ग बडी बाका जशी रावणाची
दुसरी लंका वाजतो कि डंका-डंका चहुमुलकी राहयाला गुलाबाचे फुल कि”

लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अण्णाभाऊंच्या काही कादंबऱ्या – Annabhau Sathe Kadambari
आबी
गुलाम
जिवंत काडतुसे
पाझर रानगंगा
वारणेचा वाघ
वैर
फकीरा
वैजयंता
चिखलातील कमळ
माकडीचा माळ
चंदन इ.
अण्णाभाऊ साठे यांचे कथा संग्रह : Story Collection of Annabhau Sathe

कृष्णा काठच्या कथा
गजाआड
नवती
खूळंवाडा
आबी
पिसाळलेला माणूस
फरारी
बरबाद्या कंजारी
निखारा
चीरानगरची भूतं इ.
अण्णाभाऊ साठे यांचे लोकनाट्य : Folk Drama written by Annabhau Sathe

बेकायदेशीर
लोकमंत्र्यांचा दौरा
पुढारी मिळाला
देशभक्त घोटाळे
कापऱ्या चोर
अकलेची गोष्ट
शेटजींचे इलेक्शन इ.
अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली पुस्तके : Books Written by Annabhau Sathe

अमृत
गुऱ्हाळ
तारा
रानबोका
आघात इ.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती – Annabhau Sathe Jayanti
साहित्य सम्राट, लोकशाहीर, विचारवंत, समाजसुधारक अशा कितीतरी उपाधी धारण केलेले अण्णाभाऊ साठे यांची जयंती हि १ ऑगस्ट रोजी आपण साजरी करतो. या दिवशी आपण त्यांना विनम्र अभिवादन करू.

आपण त्यांचे विचार अवलंबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजातील वैर संपविण्यासाठी त्यांचे लेखन हे खूप महत्वाचे ठरते. महाराष्ट्राला किंबहुना जगाला एक नवी दिशा देण्याचे कार्य त्यांच्या साहित्यातून घडून येत आहे.

<

Related posts

Leave a Comment