Helping Hands | गरीब शेतकऱ्यांच्या अपघात जखमेवर गावकऱ्यांच्या मदतीची फुंकर, लोकवर्गणीतुन उपचार खर्चास मदत कौतुकास्पद

Helping Hands | गरीब शेतकऱ्यांच्या अपघात जखमेवर गावकऱ्यांच्या मदतीची फुंकर, लोकवर्गणीतुन उपचार खर्चास मदत कौतुकास्पद

शिरुर कासार, (जि. बीड) | सायकलवर जाताना अपघात होऊन जखमी झालेल्या व्यक्तीच्या छातीला मार लागला. रुग्णालयातील उपचाराचा खर्चही मोठा होता. मात्र परिस्थिती सर्वसामान्य असल्याने रुग्णालयाचा खर्च पेलवणारा नव्हता. त्यामुळे कोळवाडी (ता. शिरुर कासार) येथील युवकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून अवाहन केले आणि सामान्य कुटू्बांतील व्यक्तीला 51 हजार 500 रुपयांची आर्थिक मदत देत आदर्श निर्माण केला. Financial help of villagers on accidental of farmers, treatment cost Paid from villagers

शिरुर कासार जवळील कोळवाडी येथील बाळू सावंत यांचा आठ दिवसापुर्वी झापेवाडी फाट्यावर सायकलला अपघात झाला. यात त्यांच्या छातीला मार लागला. त्यांना बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचाराचा खर्च मोठा होता. मजुर असलेल्या बाळू सावंत यांची उपचाराचा खर्च पेलवणारा नव्हता. त्यामुळे उसणवारी करुन रुग्णांलयाचा खर्च केला खरा, पण घेतलेले पैसे कसे फेडायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. त्यांना भेटण्यासाठी गेलेले शहादेव घोडके यांच्या ही बाब निदर्शनात आली. help of villagers on accidental of farmers, treatment cost Paid from villagers


 त्यानंतर घोडके व अप्पा पवने यांनी पुढाकार घेत गावांतील तरुणांच्या व्हाटसअॅपवर त्यांनी मदतीचे अवाहन केले आणि गावांतील तसचे इतरगावच्या युवकांनीही पुढाकार घेत 51 हजार 500 रुपयांची आर्थिक मदत जमा करुन आदर्श निर्माण केला. शुक्रवारी दि. 2 रोजी जमा झालेली मदत बाऴू सांवत यांना शहादेव घोडके, भिकनदास कोल्हटे यांच्या हस्ते दिली. यावेळी पत्रकार सूर्यकांत नेटके, कोळवाडीचे उपसरपंच नारायण मानकर, देविदास नेटके, ग्रामपंचायत सदस्य युवराज नेटके, अप्पा पवने, आजीनाथ सावंत, किरण जाधव, रमेश नेटके, काका कोल्हटे, महादेव पवने आदी यावेळी उपस्थित होते. सामान्य कुटूंबातील व अडचणीत सापडलेल्या बाळू सावंत यांना मदतीचे अवाहन केल्यावर कोळवाडीतील युवकांनी त्परतेने मदत करत आदर्श निर्माण केला. त्यामुळे कोळवाडीच्या युवकांचे तालुकाभर कौतुक केले जात आहे. Financial help of villagers on accidental of farmers, treatment cost Paid from villagers

बाळू सावंत यांना मदतीसाठी साईनाथ नेटके,  राष्ट्रवादी काॅग्रेसचे युवक नेते सुभाष यमपुरे, युवक नेते दत्ता पाटील सावंत,  पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय कोल्हटे, नगर जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकार सूर्यकांत नेटके, साहित्यिक विठ्ठल जाधव, सरपंच पुजा देविदास नेटके, युवा उपसरपंच नारायण मानकर, ग्रामपंचायत सदस्य युवराज नेटके, अप्पा पवने, शहादेव घोडके,   शिवाजी रघुनाथ नेटके, युवा नेते सोनाजी मानकर, राज नेटके, प्रविण चव्हाण, मराठा सेवा संघाचे नांदेड जिल्ह्याचे नेते भाऊसाहेब आश्रुबा नेटके,  शिवाजी तुपे, मनोहर चव्हाण, खुशालराजे नेटके, संतोष अशोक नेटके, बाबासाहेब बर्डे, पांडूरंग भिवषेन नेटके, शिवदास नेटके,  किरण अशोक जाधव, भगवान मोरे, कचरु नेटके सर , सचिन भागवत पवार, सौरभ जायभाये, संतोष भोसले, अोम डोळे, सौंदरमल सर, आजीनाथ सावंत, शुभम मोरे, इक्बाल शेख, महेश अर्जुन नेटके, सोनु भिलारे, रवी बांदल, अमोस सवासे सर, सुदीप बामरस, आकाश आजीनाथ नेटके, सिताराम सावंत, फौजी अनिल भिलारे, शरद पवने, गणेश विघ्ने, विकास रामकिसन नेटके, हनुमंत पवने, उद्दव वाघुलकर, शरद नेटके, करण माळी, डाॅ. कृष्णा जाधव, गणेश भिलारे,  महादेव घोडके, पांडूरंग पवने, नामदेव घोडके, सोनु कोकाटे, संदीप कोकाटे, बाबा सवासे, पांडू वाघुलकर यांच्यासह इतरांनी आर्थिक हातभार लावला. Financial help of villagers on accidental of farmers, treatment cost Paid from villagers

<

Related posts

Leave a Comment