मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर एसटी कामगारांचा न्यायालयीन लढा लढणारे गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची सुरू झालेली जेलवारी तब्बल 18 दिवस चालली. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणात सदावर्ते यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सातारा आणि कोल्हापूरातील त्यांच्यावर दाखल गुन्ह्याबाबत त्यांनी पोलीस कोठडी (Police Custody) आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
त्यामुळे त्यांचा जेलमधील मुक्काम वाढला. त्यानंतर आज सदावर्ते यांना अटकेुपासून दिलासा मिळाला. त्यानंतर संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास गुणरत्न सदावर्ते यांना आर्थर रोड कारागृहातून बाहेर सोडण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या पत्नी आणि वकील जयश्री पाटील, तसंच मुलगी झेन हे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. कारागृहातून बाहेर येताच सदावर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसंच आपली पुढील वाटचाल आणि लक्ष्यही सांगून टाकलं. (As soon as Sadavarte came out of jail, anti-government allegations started with slogans)
‘विजय हिंदुस्थानी नागरिकांचा, एसटी महामंडळातील कष्टकऱ्यांचा’
कारागृहातून बाहेर आल्यानंतर सदावर्ते यांनी हम है हिंदुस्थानी अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘भारताच्या संविधानापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. ही आहे झेन सदावर्ते माझी 13 वर्षाची मुलगी आणि ही आहे माझी पत्नी जयश्री पाटील आणि या मित्र परिवाराने या अन्यायाविरोधात मला साथ दिली. महाराष्ट्रातील देशातील हिंदुस्थानी कष्टकरी हे आमच्या सोबत राहिले.
यापुढे आमचा केंद्र बिंदू असेल भ्रष्टाचार, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करु. परंतू जय श्रीराम म्हणणारे, जय भीम म्हणणारे आणि वंदे मातरम म्हणणारे, हम है हिंदुस्थानी म्हणणारे जिंकत असतात. हा विजय हिंदुस्थानी नागरिकांचा, एसटी महामंडळातील कष्टकऱ्यांचा आहे. पुढेही बोलू आता तूर्त इतकंच’, असं म्हणत सदावर्ते गाडी बसले आणि आपल्या घराकडे निघून गेले. मात्र, पुढे आपण बोलणार असल्याचंही सदावर्ते यांनी जाहीर केलंय.
जेलमधील 18 दिवस कसे गेले?
गुणरत्न सदावर्ते यांनी आपले जेलमधील 18 दिवस कसे गेले हे देखील सांगितलं. ‘मी पहिल्यांदा पोलीस कस्टडीत होतो तिथे एक पोलीस शिपायाचा जीव वाचवू शकलो. तिथे एका पोलीस शिपायाला हृदयविकाराचा झटका आला होता. कोणत्याही फौजदाराला प्रथमोपचार माहिती नव्हते. मी त्यांना आर्टिफिशियल रेस्पिरेशन देऊन वाचवू शकलो. मी ज्या ज्या लॉकअपमध्ये गेलो तिथे त्यांना योगाचं शिक्षण दिलं. मी स्पिरिच्यूअल टॉक केले. मला एक माहिती तुम्ही कुठेही जा, तुम्ही वाईटातील वाईट बाजूला करुन चांगल्यांना चांगलं शिकवू शकता. हे मी 18 दिवसांत अनुभवलं’, असंही सदावर्ते यांनी सांगितलं. (As soon as Sadavarte came out of jail, anti-government allegations started with slogans)
हे ही वाचा ======
- Samagra Shiksha Contract Employee Regular |समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सरकारच्या आश्वासनाने स्थगित, तीन महिन्याच्या आत कायम करणार?
- India Post Office Bharti | भारतीय डाक विभागात Garmin Dak Sevak पदांच्या एकूण २१४१३ जागा
- लाडकी बहीण योजना विषयी मंत्री आदिती तटकरे यांनी केली महत्वपूर्ण घोषणा
- शिवद्रोही राहुल सोलापूरकरच्या “आग्र्याहून सुटका” ऐतिहासिक घटनेबद्दल वक्तव्यचा दूरगामीकाय परिणाम होतो. कोणत्या गोष्टीला हानी पोहोचवते.
- जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनसह पालक मेळावा, बाल विवाह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन