नांदेडशैक्षणिक

शिक्षक दिनाच्या औचित्याने शिक्षकांची मोफत तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद

अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ व माने स्किन केअर सेन्टरचा संयुक्त उपक्रम



५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तसेच माने स्कीन सेंटरच्या संयुक्त विद्यमाने त्वचारोग, सौंदर्य व केशविकारासंबंधी विविध आजाराचे शिक्षकांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नांदेडचे प्रसिध्द त्वचारोग तथा सौंदर्य तज्ज्ञ
डॉ. शरद माने(MBBS DVV पुणे) यांच्या माने स्कीन सेंटर नांदेड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उदघाटन प्रदेशाध्यक्ष देविदासराव बस्वदे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संघटक चंद्रकांत मेकाले जिल्हाध्यक्ष अशोक पाटील,सरचिटणीस प्रल्हाद राठोड उपाध्यक्ष मा. बालाजी पाटील बामणे,उपाध्यक्ष मा. संतोष कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रारंभी माने स्कीन केअर सेंटरच्या वतीने उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. सदर शिबीर जिल्हा उपाध्यक्ष मुनेश शिरसीकर व उदयकुमार देवकांबळे यांच्या पुढाकाराने संपन्न झाले.
यावेळी केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. लोलमवाड माधव साहेब ,पेंशन हक्क संघटनेचे जिल्हा सरचिटणीस मा.संदीप मस्के, सहसचिव मा. नरवाडे किशोर,मा.पाटील आनंदा, मा.चव्हाण अनिल,मा.विकास चव्हाण,मा.संग्राम कांबळे,मा गणेश मेकवाड,मा.रामचंद्र शिंदे,मा.चंद्रकांत गोगे,
मा.पांपटवार सर,मा.चोबे सर, वाखरडे सर,मा.शिवप्रसाद जाधव,मा.गायकवाड सर,मा. श्यामराव उराडे सौ. गायकवाड मॅडम, सौ.शिंदे अश्विनी मॅडम,सौ. रुख्मिणी घोरबांड व अखिल परिवार नांदेड


या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उदयकुमार देवकांबळे यांनी केले तर आभार निखील मापारे यांनी मानले. Free teacher screening camp on the occasion of Teacher’s Day

हे ही वाचा =================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 35
  • Today's page views: : 35
  • Total visitors : 512,598
  • Total page views: 539,505
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice