मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात मान्सून दाखल झाला. त्यानंतर आता चांगला पाऊस होईल या भरोशावर शेतकऱ्यांनी पेरणीकडे कल वाढवला. पण गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पावसाची उघडीप सुरु आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.
मान्सून दाखल होण्याअगोदर मान्सूनपूर्व झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण झाल्याने खरीपाच्या पेरण्या आणि लागवड करण्यास सुरुवात केली. मात्र पेरणी करण्यासाठी अपेक्षित ओलावा असल्याने काही शेतकऱ्यांनी कपाशी, बाजारी आणि सोयाबीन पेरणी केली आहे. यामागे त्यांनी एकरी 20 ते 25 हजार रुपये खर्च केला.
राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मात्र पावसाने दडी मारली. त्यातच रोज कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी देखील होणार असल्याचे दिसत आहे. आता राज्य शासनाने दुबार पेरणीसाठी मोठी आर्थिक मदत करण्याची मागणी बळीराजा करत आहे.
हे ही वाचा —————————-
- सुवर्ण क्रांतीचे जनक हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार हेमंत पाटील यांना ‘मंत्री’ पदाचा दर्जा
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी या तारखेला पडणार महाराष्ट्रात पाऊस हवामान खात्याचा अंदाज
- अखरे मान्सूनची प्रतिक्षा संपली; राज्यसह देशात दाखल; याठिकाणी मान्सूनचा पाऊस झाला हवामान खात्याची अधिकृत सुचना
- महाराष्ट्रात 25 जून नंतर सर्वत्र धुवांधार पावसाचा? | After June 25, heavy rain everywhere in Maharashtra?
- जमीन एनए प्रक्रियेत सुधारणा करण्याचा महाराष्ट्र शासनाचा नवीन निर्णय |Plot NA process