नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही; साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं! हेच अंतिम सत्य- फडणवीसांची शरद पवारांवर टीका

नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही;  साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं! हेच अंतिम सत्य- फडणवीसांची शरद पवारांवर टीका

Fadnavis criticizes Sharad Pawar and NCP

मुंबई : सध्या गोव्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रातील राजकारण गरम झालं आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोवा निवडणुकीत उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप आणि वेगवेगळी विधान केली जात आहेत. गोव्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष टीएमसी, काँग्रेसला सोबत घेऊन सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे. या वरून गोव्याचे भाजपा प्रभारी व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधला आहे. (Being a nationalist in name does not make the party national; Party of three and a half districts! This is the final truth – Fadnavis’s criticism of Sharad Pawar)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष आहे. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं! (Being a nationalist in name does not make the party national; Party of three and a half districts! This is the final truth – Fadnavis’s criticism of Sharad Pawar)

निश्चतच, भाजपा गोव्यात पुन्हा सरकार बनवणार आहे. राहिला प्रश्न अटीतटीच्या लढतीचा तर आम्ही कोणतीही निवडणूक हलकी समजत नाही. परंतु आता गोव्यात सगळ्या मोठी अडचण ही आहे की, हे निश्चित होणं बाकी आहे की लढत कोणासोबत आहे. विरोधी पक्ष आपसातच स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकदा कोणासोबत लढत आहे हे जर निश्चित झालं तर त्यावर बोलता येईल. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Being a nationalist in name does not make the party national; Party of three and a half districts! This is the final truth – Fadnavis’s criticism of Sharad Pawar)

शरद पवार म्हणाले होते, गोव्यात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. गोव्यात काही ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची होती त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिली आहे. पुढील २ दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होईल, असं शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं होतं. (Being a nationalist in name does not make the party national; Party of three and a half districts! This is the final truth – Fadnavis’s criticism of Sharad Pawar)

महत्वाच्या बातम्या

<

Related posts

Leave a Comment