महाराष्ट्रात शिंदेशाही , बहुमत चाचणी जिंकली!
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला. (cm eknath shinde bjp devendra fadanvis wins floor test maharashtra
राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी शिंदे गट आणि भाजपाने १६४ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला. (Floor Test in Maharashtra)
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. सुरुवातीला आवाजी मतदान झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात आली.
यावेळी भाजपा-शिंदे सरकारने १६४ मतांसहित बहुमताचा आकडा पार केला आणि विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर महाविकास आघाडीच्या पारड्यात केवळ ९९ मतं पडली. विरोधी पक्षाला काल पेक्षा आज ९ मत कमी पडली. (Eknath shinde-Devendra Fadnavis Floor test)
हुमत चाचणीपूर्वी उद्धव ठाकरे यांना दोन धक्के बसले. कट्टर शिवसैनिक संतोष बांगर सह शाम सुंदर शिंदे हे दोघे शिंदे गटात सामील झाले आहेत. काल संतोष बांगर यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधात मतदान केले होते. आज बांगर यांनी शिंदे यांच्या बाजूने मतदान केले.
हे ही वाचा
- इंडिया पोस्ट ऑफिस GDS भरती २०२६: सविस्तर माहिती – २८,७४० पदांसाठी अर्ज सुरू, १०वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!
- ताणतणावाचे व्यवस्थापन ते शिक्षणात AI, PFMS, आणि सुरक्षा मंत्र ! जालना जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांसाठी ‘बूस्टर’ कार्यशाळा
- बिग बॉस मराठी ६: दिव्या शिंदेची धक्कादायक हकालपट्टी! हिंसक भाषा आणि धमकीमुळे घराबाहेर
- सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ |Sunetra Pawar takes oath as Maharashtra’s first woman Deputy Chief Minister.
- Ajit Pawar Paas Away |विमान अपघातात महाराषट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच निधन

