‘ई-पीक पाहणी’ 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदत . आतापर्यंत 77 लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी.

‘ई-पीक पाहणी’ 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदत . आतापर्यंत 77 लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी.

मुंबई :- ‘ई-पिक पाहणी’च्या (E-Pik Pahani) माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंद ही स्व:ता करायची आहे. ‘ई-पीक पाहणी’ द्वारे शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीमुळे कारभारात पारदर्शकता येणार आहे. (State Government) शिवाय यंत्रणेत कोणी मध्यस्थी नसल्याने थेट लाभ हा शेतकऱ्यांना होणार आहे. ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून पिकांची नोंदणी या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे. हा ऐतिहासक निर्णय असून शेतकऱ्यांची गैरसाय ही टळणार आहे. आता यामध्ये सहभागी होण्यासाठी केवळ 5 दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. वाढीव मुदतीचा शेतकऱ्यांनी चांगलाच फायदा घेतला असल्याचे दिसून येत आहे. कारण राज्यातून तब्बल 77 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचा अहवाल महसूल विभागाकडे देण्यात आलेला आहे. ‘E-Crop Survey’ E-Pik Pahani deadline is October 15. So far 77 lakh farmers have registered.

‘ई-पीक पाहणी’ या उपक्रमाला सुरवात झाली तेव्हा राज्यात पावसानेही थैमान घातलेले होते. त्यामुळे नोंदणीला अडचणी निर्माण झाल्या होत्या. शिवाय याबाबत शेतकऱ्यांना अधिकची माहितीही नव्हती. त्यामुळे शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून याला विरोध होत होता. मात्र, दरम्यानच्या काळातील जनजागृती आणि या उपक्रमाचे महत्व शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे. आतापर्यंत तब्बल 77 लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदत असणार आहे.

जनजागृतीमुळेही वाढला सहभागया उपक्रमाच्या सुरवातीला शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवण्याकडे दुर्लक्ष केले होते. शिवाय शेतकऱ्यांना नोंदणी करायची कशी? याची माहितीही नव्हती. मात्र, दरम्यानच्या काळात महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी गावागावात जाऊन जनजागृती केली. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यात आले. परिणामी शेतकऱ्यांचा सहभाग वाढला असल्याचे पाहवयास मिळत आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना केलेले मार्गदर्शन फायदेशीर ठरलेले आहे.

अशी वाढली आतार्यंत मुदत ‘ई-पिक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंद करण्याची हे पहिलेच वर्ष आहे. सुरवातीला 15 सप्टेंबर पर्यंतच मुदत होती. मात्र, शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा याअनुशंगाने 30 सप्टेंदरपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. आता तलाठी आणि कृषी अधिकारी यांच्यामार्फत ही नोंदणी करण्यास सुरवात होती. पण राज्यात अतिवृष्टी झाल्याने पिकाची नोंद करणे शक्य झाले नाही त्यामुळे आता 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. ‘E-Crop Survey’ deadline is October 15. So far 77 lakh farmers have registered.

‘ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे

1) ‘ई-पीक पाहणी’ या अ‍ॅपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक.


2) या अ‍ॅप वरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकर उपलब्ध होणार आहे.


3) पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे.


4) पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे.


5) एका मोबाईलहून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळेच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे. (77 lakh farmers’ crops harvested through e-crop inspection, deadline till October 15)

==========================================================================================

<

Related posts

Leave a Comment