बीड केज तालुक्यातील मस्साजोग येथे आवदा पवनचक्की उर्जा कंपनीचे मध्यवर्ती कार्यालय व गोडाऊन यार्ड असलेल्या ठिकाणी कंपनीच्या खंडणी प्रकरणावरून मस्साजोग गावच्या तसेच खंडणी मागायला आलेल्या खंडणी मागणाऱ्या मध्ये झालेल्या वाद, व त्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खंडणी मागणाऱ्यानी निर्दयीपणे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून केलेले निर्घृणपणे हत्या केली. Dhananjay Munde should be immediately removed from the post of Maharashtra Government Minister, Ajit Pawar is facing the villagers.
सदरील खंडणी प्रकरणांमध्ये आरोपी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, व इतर चार यांच्यासह धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती सहकारी वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, व इतर चार लोकांवर गुन्हा नोंद झालेला आहे. यापैकी प्रतीक घुले सह दोन आरोपी अटक झालेले असून विष्णू चाटे यांनी स्वतः समर्पण केलेले आहे तर. मुख्य आरोपी सुदर्शन घुले सह इतर तीन आरोपी अजूनही अटक झालेली नाहीत. Dhananjay Munde should be immediately removed from the post of Maharashtra Government Minister, Ajit Pawar is facing the villagers.
नागपूर अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच यांच्या कुटुंबियास भेट देण्यासाठी गेले होते. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन अजित पवार यांनी सरकारच्या वतीने काय कारवाई करणारे याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी आय जी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत एसआयटी चौकशी व दुसरी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत न्यायालयीन चौकशी करणार असल्याचे दोन प्रकारच्या चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचेही यावेळी सांगितले.
कुटुंबीयाला भेट देत असताना त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्यसह मुलांची चौकशी केली तसेच मुलगी व मुलगा कोणत्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे व कुटुंबातील इतर सदस्य बाबत चौकशी केली. सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीने आरोपीना कठोऱ्यात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली. तसेच त्यांच्या भावाने झालेला सर्व घटनाक्रम त्यांच्यासमोर मांडला.
अजित पवार संतोष देशमुख कुटुंबीयांना भेटल्यानंतर गावातील नागरिकांना भेटावे व गावकऱ्यांचे याविषयी काय मत आहे हे जाणून घ्यावे अशी अपेक्षा गावकऱ्यांची होती. परंतु अजित दादांनी कुटुंबाची भेट घेतल्यानंतर लगेच आपल्या गाडीकडे गेले. गावकरी पाठीमागून ओरडत असताना आमची भेट घ्या आमची भेट घ्या परंतु अजित पवारांनी त्यांचा ऐकलं नाही असं गावकऱ्यांचा आरोप आहे. याच धावपळीत अनेक गावकऱ्यांनी जोरजोरात घोषणा दिल्या जोपर्यंत एसआयटीची व या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरुन तात्काळ काढा. तसेच वाल्मीक कराड यांना तात्काळ अटक करा व या प्रकरणात आरोपी करा. असे घोषणा गावकऱ्यांनी दिल्या.