देगलूर बिलोली विधानसभा,पंढरपूरची पुनरावृ्त्ती होणार ?

देगलूर बिलोली विधानसभा,पंढरपूरची पुनरावृ्त्ती होणार ?

Degloor Biloli Assembly by election, Pandharpur to be repeated?

Deglur Biloli Assembly by election, Pandharpur to be repeated?

नांदेड: काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळं नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. काँग्रेसनं रावसाहेब अंतारपूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपनं शिवसेनेतील नाराज असलेले सुभाष साबणे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी दिली आहे. पोटनिवडणुकीच्या निमित्तानं मतदासंघातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! पण लॉटरी एकदाच लागते; नेहमी-नेहमी नाही, हे भाजपने लक्षात ठेवावं, असा इशारा माजी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. Deglur Biloli Assembly by election, Pandharpur to be repeated?


अंतापूरकर विरुद्ध साबणे
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होतेय. त्यासाठी काँग्रेसने त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. तर याच ठिकाणी पराभूत झालेले शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे देखील रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये या पोट निवडणुकीच्या निमिताने दिवाळी आधीच फटाके फुटायला सुरुवात झालीय. ection, Pandharpur to be repeated?

अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?
काल भाजपची सभा देगलूर झाली, भाजपनं पंढरपूरची पुनरावृ्त्ती होणार, असं म्हटलं. दोस्तहो लॉटरी किती वेळा लागते, एकदाच लागते. जीवनात पुन्हा लॉटरी लावल्यास पैसे जात राहतात. पंढरपूरची लॉटरी भाजपला एकदा लागली. वारंवार ती लागणार आहे. आम्हाला काम करणाऱ्याला ताकद द्यायची आहे. भाजपसाठी पोटनिवडणूक सट्टा आहे, नांदेड जिल्हा हा सट्टाबाजार नाही. नांदेड जिल्हा हा विकासाच्या वाटेवर चालणारा, शंकरराव चव्हाण यांच्या विचारांवर चालणारा जिल्हा आहे. रावसाहेब अंतापूरकर यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देण्याच्या विचारातून देगलूर बिलोलीची जनता जितेश अंतापूरकर यांना विजयी करेल यात शंका नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. Degloor Biloli Assembly by election, Pandharpur to be repeated?

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना काँग्रेसकडून उमेदवार आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार जितेश अंतापूरकर यांना देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे.जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाने निधन झाल्यामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. Degloor Biloli Assembly by election, Pandharpur to be repeated?

================================================================================================================================================

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice