Online Team : कोव्हॅक्सिन (Covaxin) लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. भारत बायोटेकने तिस-या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारे हा दावा केला आहे. हा डेटा अद्याप पडताळण्यात आलेला नाही. कोव्हॅक्सिन (Covaxin) लस घेतली असता वेगाने पसरणा-या डेल्टा व्हेरियंटविरोधात ६५.२ टक्के सुरक्षा मिळते असा भारत बायोटेकचा दावा आहे. याशिवाय कोरोनाच्या इतर लक्षणांविरोधात ९३.४ टक्के प्रभावी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
भारत बायोटेकने आयसीएमआर आणि एनआयव्ही पुणेसोबत भागीदारी करत कोरोनाविरोधातील कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीची निर्मिती केली आहे. भारत बायोटेकने कोरोनाची लक्षणे असणा-या १३० जणांची चाचणी केली आहे. गेल्या दोन आठवड्यात देशभरातील एकूण २५ ठिकाणी ही चाचणी पार पडली. चाचणीमध्ये सहभागी झालेल्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला होता. लसीचा परवाना मिळालेल्या कोणत्याही कंपनीने संसर्गाविरोधात इतकी कार्यक्षमता दाखवलेली नसून यामुळे कोरोना संसर्गाचा दर कमी होण्यास मदत मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. भारत बायोटेकच्या सह-संस्थापक सुचित्रा इल्ला यांनी ट्वीट करत भारताला वैज्ञानिक दृढनिश्चय, क्षमता आणि वचनबद्धतेसह जागतिक नकाशावर ठेवल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हटले आहे.
२५ शहरांमधील १३० जणांवर चाचणी
भारत बायोटेकने लक्षणे असणा-या २५ शहरांमधील १८ ते १८ वयोगटातील एकूण १३० जणांवर वैद्यकीय चाचणी केली. यावेळी १२ टक्के लोकांना थोडा त्रास जाणवला तर ०.५ टक्क्यांपेक्षा कमी लोकांना गंभीर त्रास जाणवला अशी माहिती कंपनीने दिली आहे. यावेळी त्यांनी इतर लसींच्या तुलनेत प्रतिकूल परिणामाचा दर कमी असल्याचे म्हटले आहे.
- मोठी बातमी रायगड किल्ल्यावर सापडला महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा “यंत्रराराज” | Astrolabe found during excavations at Rayagada Fortस्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर यंत्रराज सापडल्याची मोठी माहिती समोर आली आहे. हा ऐतिहासिकदृष्ट्या … Read more
- JEE Advanced 2025: कोटाच्या राजित गुप्ताने मिळवली ऑल इंडिया रँक 1कोटा, 2 जून 2025: भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) कानपूरने आज JEE ॲडव्हान्स्ड 2025 … Read more
- Miss world grand finale contestants 2025 | ७२व्या मिस वर्ल्ड २०२५ विजेती थायलंडच्या ओपल सुचाता चुआंग्सरीमिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेचा भव्य समारोप ३१ मे २०२५ रोजी भारतातील हैदराबाद येथे … Read more
- लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना या कारणांमुळे पुण्यश्लोक म्हणतातअहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चौंडी येथे मानकोजी शिंदे आणि … Read more
- तंत्रस्नेही व अभ्यासू अशी ओळख असलेले शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांची जालनावरुन बदलीजालना प्रतिनिधी | प्रत्येक वर्षी मे महिन्यात शासनस्तरावरुन सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या विनंती व … Read more