समाजकारण

छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महिला अध्यक्ष पदी मा. सौ. रुपाली ताई पाटील यांची नियुक्ती

Chhatrapati Sambhaji Maharaj Seva Samiti Women Chairperson Appointment of Rupali Tai Patil

छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती च्या महिला अध्यक्ष पदी मा सौ. रुपाली ताई पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून आज श्री क्षेत्र तुळापूर येथे अध्यक्ष शंकर अप्पा जाधव, उपाध्यक्ष राहुल आबा हरगुडे, मार्गदर्शक अप्पासाहेब हरगुडे, मा. सरपंच गणेश पुजारी, मा. उपसरपंच संतोष शिवले ग्रा. सदस्य नवनाथ शिवले यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपस्थित मयूर गावडे, आकाश घळके, उद्धव शिवले, बाबासाहेब झावरे आणि निशा ताई पाटील यांनी ताईंचे अभिनंदन केले. ताई गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेतच, वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे, पुढील पिढी व्यसनापासून दूर राहून विचारांनी एकदम पक्की करणे यासाठी त्या वेळोवेळी प्रयत्नशील असतात.

त्यांचा सामाजिक कार्याचा अनुभव, स्पष्टपणा, निर्भिडपना, नेतृत्वगुण आणि प्रबोधनात्मक विचार या सर्व गुणांचा विचार करून त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती समितीचे सचिव आकाश शिंदे यांनी दिली.

सदरील निवडी बाबत शिवशंभू प्रेमी जगदीश पाटील व त्यांचे मित्र मंडळ नांदेड यांनी आंनद व्यक्त करत शुभैछच्या दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 26
  • Today's page views: : 27
  • Total visitors : 504,590
  • Total page views: 531,348
Site Statistics
  • Today's visitors: 26
  • Today's page views: : 27
  • Total visitors : 504,590
  • Total page views: 531,348
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice