असा झाला प्रवासी बसचा भीषण अपघात 26 प्रवाशांचे गेले प्राण | Buldhana Bus Accident On Samruddhi Highway 26 Passengers Died

असा झाला प्रवासी बसचा भीषण अपघात 26 प्रवाशांचे गेले  प्राण | Buldhana Bus Accident On Samruddhi Highway 26 Passengers Died

समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघाता

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा (Sindkhed Raja) शहराजवळ 1 जुलै रोजी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघातात (Bus Accident) झाला. ज्यामध्ये बसमधील तब्बल 26 प्रवाशाचा आगीत होरपळून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. (26 passengers Death) खाजगी ट्रॅव्हल्सची बस नागपूरहून मुंबईकडे जात असताना अचानक टायर फुटल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर लागलेल्या आगीने 26 प्रवाशांचे जीव घेतले. (buldhana bus accident 26 passengers died bus accident on samruddhi highway who exactly traveling list of passengers in bus vidharbha travels nagpur yavatmal wardha)

बुलढाण्यात (Buldhana) एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे.

ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याकडे जात होती. त्यावळेळी हा अपघात घडला. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला.

डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या 33 प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice