काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सनी लिओनीने मुंबईत नवे घर खरेदी केल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन Amitab Bachchan यांनी मुंबईमध्ये नवे घर खरेदी केले आहे. बिग बींने खरेदी केलेले घर हे सनी लिओनीच्या Sunny Leone घराच्या शेजारी असल्याचे म्हटले जात आहे. या घराची किंमत तब्बल ३१ कोटी रुपये आहे. या घरासाठी अमिताभ यांनी ६२ लाख रुपये स्टॅम ड्यूटी भरली असल्याचे समोर आले आहे.
अमिताभ बच्चन यांनी डिसेंबर २०२० मध्ये ही नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या घराची किंमत ३१ कोटी रुपये आहे. पण एप्रिल २०२१मध्ये या घराचे रेजिस्टेशन करण्यात आला आहे. या प्रॉपर्टीसाठी अमिताभ यांनी ६२ लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी भरली आहे.
अमिताभ यांनी खरेदी केलेले हे घर २७व्या आणि २८व्या मजल्यावर असून ५१८४ क्वेअर फीट आहे. तसेच त्यांना ६ गाड्या पार्किंगची जागा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी नवे घर खरेदी करताना दिसत आहेत.
अमिताभ यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच त्यांचा ‘झुंड’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अमिताभ हे ‘गूड बाय’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. त्यांचा आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ‘बह्मास्त्र’ हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.