Black Fungus “म्युकोरमायकोसिस (ब्लैक फंगस) म्हणजे काय? काळजी व उपचार

Black Fungus “म्युकोरमायकोसिस (ब्लैक फंगस) म्हणजे काय? काळजी व उपचार

म्युकोर मायकोसिसहा बुरशीजन्य रोग [ ब्लैक फंगस ] आहे.हा रोग ‘म्युकोरेल्स’ या फंगस मुळे होतो.कोविड च्या उपचारा नंतर काही रुग्णांना हा रोग दिसुन येत आहे. कोविड मुळे व मधुमेह किंवा इतर सहव्याधींमुळे, तसेच उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉइड मुळे ही रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते या संधीचा फायदा बुरशी [फंगस] घेते वया रोगाला ला सुरुवात हाेते. नाकाच्या मार्गे हि बुरशी नाकामागच्या सायनस मध्ये,तोंडामध्ये विशेषत वरच्या जबड्यात व दातात,डोळ्यापासून ते मेंदूपर्यंत पोहचते. या बुरशीचा पसराव अति वेगाने असून उपचारासाठी खुपच कमी वेळ मिळतो.

लवकर निदान झाले तर औषोधोपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो पण उशीर झाला तरशस्त्रक्रिया पण करण्याची वेळ येते. रिस्क फॅक्टर्स-कोरोना सोबत खालील रोग असल्यासम्युकोर मायकोसिस ची लागण लवकर होते..

1. मधुमेह/डायबिटीज 2. HIV / AIDS . 3. जास्त वेळ व मात्रा मधे स्टेरॉइड्स चा वापर.4. ब्लड प्रेशर5. विविध कँसर6. लिव्हर सिरोसिस7. अति लट्ठपणा निदान करण्यासाठी लक्षणे तोंड व दांत चेहर्‍यावर सज येणे, तोंडातून दुर्गंधी येणे, तोंडातून पु येणे, हिरड्यांवर फोड़ किवा सूज येणे, अचानक दात हालणे व पडणे, दातांची जखम न भरणे. नाक सर्दी असणेनाक बंद असणेसाइनस च्या जागेत दुखणेनाकातुन रक्त येणेनाक दुखणे, डोळे दुखणे व सुजणे डोळ्यांनी कमी दिसणे/ न दिसणे मेंदू डोके दुखणे मेंदूच्या नसांचा त्रास होणे.

निदान कसे करणार

1. बायोप्सी (Biopsy) बुरशी च्या जागेतुन तुकड़ा काढून टेस्टिंग करणे. 2.नाकातुन स्वॅब घेऊन तपासणी /fungal culture 3. रेडियोलॉजिकल #CT Scan or MRI PNS & orbit or brain

वरील लक्षणे आढळ्यास खालील डॉक्टरांचा सल्ला घेणे व वेळेवर ताबड़तोब उपचार करून घेणे.

1. दंतरोग तज्ञ

2. नाक, कान, घसा तज्ञ

3. नेत्र रोग तज्ञ

4. मेंदु रोग तज्ञ

5. फिजिशियन

उपचार कसा करावा म्युकोर मायकोसिस चे निदान झाल्यानंतर खालीलप्रमाणे उपचार करावे1. मधुमेह (systemic problems or predisposing factors) व इतर रोगांचा उपचार करून नियंत्रण करावे.

2 शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताबड़तोब आवश्यकतेनुसार आपरेशन करूनखराब झालेले हाड़ व शरीराचा इतर भाग काढून घेणे.

3. औषधोपचार #इंजेक्शन -अँफोटेरीसिन बी Amphotericin B Plain /Lyposomal#Tablet इसावुकोनाझोल

(Isavuconazole)orपोसैकोनझोल (Posaconazole) कोरोनाच्या संकटातुन बरे झाल्या नंतर म्युकोर मायकोसिस न हाेवो यासाठी घ्यावयाची काळजी

1. शरीरातील साखरेची पातळी नियंत्रीत ठेवा.

2. स्टेरॉइड चा गरजे पेक्षा जास्त वापर नको.

3.अॅक्सिजन थेरपी साठी स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा वापर ह्युमिडीफायरसाठी करा.

4. रुग्णांनी नाक, डोळे, तोंडाची व शरीराची योग्य ती स्वच्छता ठेवणे अतिशय गरजेचे आहे.

5. कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. उपचारासाठी – राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात म्युकर मायकॉसिस वर मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्याच बरोबर महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत च्या रूग्णालयात ही हे उपचार मोफत होतील.

लवकर निदान होणे अत्यंत गरजेचे आहे भिती नको काळजी हवी जनहितार्थ प्रकाशन

राष्ट्रवादी डॉक्टर सेल, महाराष्ट्र प्रदेश डॉ.नरेंद्र काळे (प्रदेश अध्यक्ष)

सदरिल लेख जनहितार्थ डा. नरेंद्र काळे यांच्या फेसबुक वरुन जसास तसा.

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice