NCP Split | अशी फुटली राष्ट्रवादी NCP Crisis; शरद पवारांच्या मर्जीने झाले असेल का ?

मुंबई 2 जुलै – महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकाच वर्षात दोनदा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली आहे. NCP Crisis, NCP Split अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, ज्यात अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. Ajit Pawar News याशिवाय छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनाही मंत्रिपद मिळालं आहे. Big split in NCP party with Ajit Pawar along with BJP

मागच्या काही काळापासून अजित पवार सत्तेमध्ये सहभागी होतील, अशा चर्चा सुरू होत्या, पण अजित पवारांचं हे बंड यशस्वी कसं झालं? पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडल्या याची माहिती आता समोर आली आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडाची वर्षपूर्ती होत नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

राजभवनात हा शपथ विधी सोहळा दुपारी अडीच वाजता सुरू झाला. सुरुवातीला अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. (Ajit Pawar Takes oath as deputy chief minister of Maharashtra)

अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

राजभवनावर दाखल झाल्यानंतर अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यानंतर शपथविधी सोहळा सुरू झाला. यावेळी राज्यपाल बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली, तर इतर नेत्यांना मंत्रीपदाची शपथ दिली.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते पवाराच्या मर्जीने राष्ट्रवादी फुटली आहे का? अजित पवार हे शरद पवार यांच्या मर्जीने राष्ट्रवादीच्या बाहेर गेलेले आहेत का? अशी चर्चा गावागावांमध्ये सुरू झाली असून नेमकी राष्ट्रवादीची फुट का झाली. शिवसेनेपासून फारकत घ्यायची होती म्हणून पहिली फळी भाजपकडे पाठवली का अशा प्रकारच्याही चर्चेला उधान आलेले आहे. नेमकी फुट का झाली हे येणारा काळच ठरवेल.

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice