पंजाब डख हवामान अंदाज दि १८ सप्टेंबर २०२२ इथे होणार मुसळधार परतीचा पाऊस । Panjab Dakh Havaman Andaj Today

पंजाब डख हवामान अंदाज दि १८ सप्टेंबर २०२२ इथे होणार मुसळधार परतीचा पाऊस । Panjab Dakh Havaman Andaj Today

अवकाळी पाऊस

Panjabrao Dakh Upto 18 September Havaman Andaj | ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस (Rain) होता. मात्र दुसऱ्या पंधरवड्यात राज्यात पावसाने (Monsoon News) चांगलीच उघडीप दिली होती. यामुळे खरीप हंगामातील पिके होरपळत असल्याचे दृश्य देखील आपणास बघायला मिळाले.

मात्र 31 तारखेला म्हणजेच गणरायाच्या आगमनाच्या दिवशी महाराष्ट्रात पावसाला (Monsoon) सुरुवात झाली. राज्यातील अनेक भागात 31 तारखेला तसेच 1 सप्टेंबर रोजी पाऊस झाला. मात्र असे असले तरी हा पाऊस राज्यात सर्वदूर नव्हता. त्यामुळे अजूनदेखील राज्यात अनेक भागात शेतकरी बांधव पावसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान पंजाबराव डख यांचा सप्टेंबर महिन्यातला सुधारित हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव डख यांनी आपल्या नवीन अंदाजात 18 सप्टेंबरपर्यंत राज्यात कस हवामान असेल याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनो पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, 4 सप्टेंबर पासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

5 सप्टेंबर पासून ते जवळपास 18 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव (Panjab Dakh Weather Report) यांनी नमूद केले आहे. मात्र सदर कालावधीत पाऊस हा भाग बदलत कोसळणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे. एवढेच नाही तर शेतकरी बांधवांनी चार तारखेपर्यंत आपली शेतीची कामे करून घ्यावीत तसेच शेतमाल व आपल्या पशुधनासाठी योग्य ती व्यवस्था करून घ्यावी असे देखील पंजाब राव यांनी सांगितले आहे.

कारण की 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी चार तारखेपर्यंत आपले आवश्यक सर्व कामे करून घ्यावीत जेणेकरून अतिवृष्टीच्या काळात त्यांना नुकसान सहन करावे लागणार नाही. मित्रांनो पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अधिक राहणार असून पाच तारखेपासून 18 तारखेपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.

हे ही वाचा —–

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice