स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा- मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना.

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा- मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना.

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे व स्पर्धेचे आहे.या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवणे खूप महत्त्वाचे असते . जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपण तक्रारी न करता, आहे त्या परिस्थितीचा आपल्या ध्येयाप्रती सदुपयोग करून घेऊ शकतो. कितीही कठीण काळ असला तरी त्यावर मात करून आपण आपलं भविष्य घडवू शकतो त्यामुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन मार्गक्रमण करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना श्रीमती वर्षा मीना यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करिअर मार्गदर्शनाच्या पहिल्या वर्गाची उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक श्रीमती मंगल धुपे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जालना श्रीमती आसावरी काळे, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग वाल्मिक गिते,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ सुनिल मावकर, पी. के. शिंदे, अर्जुन पवार, भाऊसाहेब नेटके यांची उपस्थिती होती. Always keep a positive attitude while preparing for competitive exams – Chief Executive Officer Smt. Varsha Meena.

यावेळी पुढे बोलतांना श्रीमती वर्षा मीना म्हणाल्या की, विद्यार्थांनी सुरुवातीलाच आपल्याला कुठल्या विषयात करिअर करायचे आहे हे निवडावे. नंतर निवडलेल्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थांना आवश्यक असलेली संदर्भ साहित्यांची योग्य निवड तज्ञ मार्गदर्शकाकडून करुन घेतल्यास निश्चितच आपण यशाकडे वाटचाल करु शकतो. स्पर्धा परिक्षेची तयारी करत असतांना केवळ आपण युपीएससीचीच तयारी करायची आणि त्यात जर अपयश आले तर आपले भविष्य अंधकारमय झाले असे मुलांनी समजु नये. युपीएससी परिक्षेत तुम्हाला यश नाही मिळाले तर एमपीएससी किंवा अनेक शासकीय पदासाठीच्या स्पर्धा परिक्षा विद्यार्थांनी देत राहाव्यात.

यावेळी श्रीमती वर्षा मीना यांनी स्वतःचा युपीएससीचा प्रवास उपस्थित विद्यार्थांना उलगडून दाखवला.
या करिअर वर्गास , कृषी महाविद्यालय खरपुडीचे प्राचार्य श्री देशमुख व विद्यार्थी, बळीराजा करियर अकॅडमी खरपुडीचे श्री काळे सर व विद्यार्थी , मत्सोदरी इंजिनीरिंग कॉलेजच्या श्रीमती पाटील,भाऊसाहेब नेटके, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जालना येथील विद्यार्थांची उपस्थिती होती.सुत्र संचलन व आभार प्रदर्शन डॉ सुनील मावकर यांनी केले.

<

Related posts

Leave a Comment