CCTV video goes viral on the day before Sarpanch Santosh Deshmukh’s murder, Deshmukh’s brother with the accused, argument after argument, what is the truth of CCTV
Santosh Deshmukh Murder Case |मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि धनंजय देशमुखांची भेट झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या भेटीच्या वेळी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखही त्या ठिकाणी असल्याचं दिसतंय. या भेटीनंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुखांची हत्या झाली होती. या प्रकरणी धनजंय देशमुखांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आरोपी आणि पीएसआय साहेब त्या हॉटेलमध्ये होते, त्यावेळी आपणही चहा प्यायला त्या ठिकाणी गेलो होतो असं ते म्हणाले. CCTV video goes viral on the day before Sarpanch Santosh Deshmukh’s murder, Deshmukh’s brother with the accused, argument after argument, what is the truth of CCTV
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी केज शहरातील एका हॉटेलमध्ये संतोष देशमुख यांचे लहान बंधू धनंजय देशमुख हे त्यांच्या मित्रसह त्या हॉटेलमध्ये चहा पीत असताना या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले व पीआय राजेश पाटील त्या हॉटेलमध्ये आले असे या सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. सदरील व्हिडिओमुळे महाराष्ट्रात चर्चा तर्क वितर्क लावले जात असून व्हिडिओ बाबतीत गोंधळलेले वक्तव्य केले जात आहेत. परंतु संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या आदल्या दिवशी आरोपी सुदर्शन घुले आणि पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील हे केज शहरातील बसंत बिहार या उडपी हॉटेल भेटले होते. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दोघे बोलत असताना चार मिनिटांनी त्या ठिकाणी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आल्याचं दिसतंय. CCTV video goes viral on the day before Sarpanch Santosh Deshmukh’s murder, Deshmukh’s brother with the accused, argument after argument, what is the truth of CCTV
याबाबत संतोष देशमुख यांनी स्पष्ट खुलासा केलेला आहे की मी माझ्या मित्र सह त्या हॉटेलमध्ये अगोदर चहा पीत असताना त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व मुख्य आरोपी सुदर्शन घुले हे त्या ठिकाणी आले व मला पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी मला आवाज दिला त्यामुळे मी त्यांच्या टेबलावर गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर मला काल काय गावात भांडण झाली होती ती मिटले का सर्व असे विचारले, ” मी त्यांना सांगितलं जे काही भानगड झाली होती पवनचक्कीच्या प्रकरणा वरुन ते सर्व भांडण मिटलेली आहे. असं एवढंच माझं आणी त्यांच बोलणं झाल. त्यानंतर मी माझ्या टेबलवर गेले ते सर्व सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे.