बीडमधील नांदूरघाट गावात बुधवारी (१५ मे) रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या दगडफेकीच्या घटनेत अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी दुपारी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट घेतली, तसेच त्यांची विचारपूस केली. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. तसेच हल्लेखोर, हल्लेखोरांना पाठिशी घालणारे नेते आणि सत्ताधाऱ्यांना निर्वाणीचा After the elections in Beed, Vanjari Maratha communal tensions increased; Manoj Jarange Patil’s question to Munde brother and sister
इशारा दिला. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मलादेखील धमक्या दिल्या जात आहेत. माझ्याविरोधात समाजमाध्यमांवर पोस्ट लिहायला सांगितलं जात आहे. मात्र मी या सगळ्यांना घाबरणार नाही. उलट माझा आरक्षणासाठीचा लढा आणखी तीव्र करणार आहे.” After the elections in Beed, Vanjari Maratha communal tensions increased; Manoj Jarange Patil’s question to Munde brother and sister
तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात फिरायचं आहे. तुमची गुंडगिरी आम्ही किती दिवस सहन करायची, असा सवाल विचारत मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे बहीण-भावावर हल्लाबोल केला. बीडच्या नांदुर घाट गावात रात्री झालेल्या दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांची मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गुरुवारी बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र डागले. मला सुद्धा धमकी देत आहेत, बघून घेऊ ,कचाट्यात ये मारून टाकू, मला बीडमध्ये (Beed News) येऊ द्यायचं नाही, असे म्हणत आहेत. आता तर मी रोज बीडमध्ये येणार, दोघं बहीण-भाऊ कार्यकर्त्यांना माझ्या विरोधात पोस्ट टाकायला लावत आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाला नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला. पण मी एकदाही म्हणालो नाही पंकजा ताईला पाडा किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार पाडा. पण हे आम्हाला माहिती आहे वेळ निघून गेले की असं होणारच. मी बलिदान देण्यासाठी तयार आहे. मात्र, मी मागे हटणार नाही. मला बीडमध्ये येऊ देणार नाहीत तर तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात फिरायचं आहे. तुमची गुंडगिरी आम्ही किती दिवस सहन करायची आमच्याकडेही खुंखार लोक आहेत. मराठा समाज इतका लेचापेचा नाही, तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात आणि मुंबई, पुणे, संभाजीनगरला फिरायचं आहे. मला बीडमध्ये येऊ देणार नाहीत, असं म्हणत आहेत. मराठा समाजाचे असे उपकार फेडता का? तुमच्या व्यासपीठावर मराठा समाजातील नेत्यांना बसायला जागा नव्हती.
मराठा समाजात खूप मोठी खदखद निर्माण झालेय: मनोज जरांगे
मराठ्यांची मतं लागतात, मराठ्याचे नेते प्रचाराला लागतात. मराठ्याच्या मतांवर मोठे व्हावे लागते, पण अन्याय हा प्रत्येकवर्षी सुरु आहे. स्वतःचे संकट अंगावर आहे त्यावेळेस आपला सहित पाया पडतात आणि संकट निघून गेलं की लगेच बदलतात. आष्टी पाटोद्यात काय झालं, बीडमध्ये काय झालं, माजलगाव आणि परळीमध्ये काय झालं संपूर्ण महाराष्ट्र बघतोय.
मराठ्यांच्या जीवावर मोठा घेऊन मराठ्यांचा जीव घ्यायचा असेल तर मराठा जीव द्यायला तयार आहे. दोघा बहीण-भावांचा विषय आहे. शेवटी मराठी मत घ्यायचे मोठे व्हायचं, कोणत्याही पक्षात राहायचं आणि मोठं व्हायचं. हा खरा अपमान मराठा नेत्यांचा आहे. जात संपली तर नेत्यांना काय किंमत राहणार?, असा सवाल जरांगे -पाटील यांनी उपस्थित केला.
माझं रक्षण मराठा समाज करत आहे. मला कोणाची गरज नाही. बघू किती दिवस सहन होत आहे. ते पोलीस अधीक्षक कशामुळे गुन्हे दाखल करून घेत नाहीत? लेकरांची तडफड होते, गृहमंत्री साहेबांचे राज्य आहे का? अन्याय सुरू आहे. जात संपली की तुम्हीही संपलात, मराठ्यांच्या नेत्यांनो सावधान, आम्ही शांत पद्धतीने बघणार आहोत. बहिण भाऊ किती दिवस हल्ले करून येतात हे पाहणार आहोत. जोपर्यंत सहन होत आहे, तोपर्यंत सहन करू, पण मराठा समाजात खूप मोठी खदखद निर्माण झाली आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. After the elections in Beed, Vanjari Maratha communal tensions increased; Manoj Jarange Patil’s question to Munde brother and sister