हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, त्यामुळे पावसाबाबतची शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, मागील जुलै महिन्याच्या 25 तारखेपासून पावसात खंड पडला होता, त्यामुळे साधारणतः हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 12 तारखेपर्यंत पावसाचा खंड असणार आहे असे सांगण्यात आलेले होते, तर पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
या तारखे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता
राज्यामध्ये 16 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर असणार आहे, तसेच गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावलेली होती व त्यादरम्यान अनेक भागांमध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला व त्यामुळे नदी नाले सुद्धा भरून वाहले, परंतु काही भागांमध्ये धरण भरण्याचे राहिलेले आहे, हवामान अभ्यासक पंजाब डख त्यांनी राज्यात 16 ते 30 ऑगस्ट या तारखे दरम्यान जास्त पावसाची शक्यता वर्तलेली आहे, व या तारखे दरम्यान धरणे सुद्धा भरणार आहे.
बारा ते तेरा ऑगस्टला राज्यातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसणार आहे परंतु जोरदार पावसाची सुरुवात 16 तारखेपासून होणार आहे. तसेच 16 ते 30 या तारखे दरम्यान सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे तसेच ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा या तारखे दरम्यान पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी दुष्काळ पडणार नाही असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवलेला आहे.