मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.13 जून ) राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने 10 मोठे निर्णय घेतले आहेत. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यापुढे सुधारित दराने मदत मिळणार आहे. यासाठी तब्बल 1500 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. Maharashtra State Cabinet Meeting
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते. आता या शेतकऱ्यांना नवीन सुधारित दराने मदत देण्यात येणार आहे. या सुधारित दाराप्रमाणे जिरायत शेत जमिनीसाठी 8 हजार 500 तर बागायत जमिनीसाठी 17 हजार रुपयांप्रमाणे मदत मिळणार आहे. याबरोबरच शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
⏩ सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करणार; १५०० कोटीस मान्यता.
⏩ कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय; आता मिळणार १६ हजार रुपये.
⏩ अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यात केंद्राप्रमाणे सुधारणा.
⏩ पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढविली.
⏩ लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार.
⏩ पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार.
⏩ अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ.
⏩ मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना.
⏩ स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली.
⏩ चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार.