आघाडी सरकारची दोरी एकनाथ शिंदेच्या हातात; शिंदे नॉट रिचेबल
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याचं कारण म्हणजे विधान परिषदेचा निकाल लागल्यापासून म्हणजे कालपासून एकनाथ शिंदेंशी कोणताही संपर्क झालेला नाही. शिंदेंसोबतच शिवसेनेचे १३ आमदारही संपर्कात नाहीत. हे सर्वजण गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदेंचं सरकारमधलं आणि शिवसेनेतलं महत्त्व काय? या सगळ्याबद्दल जाणून घ्या…(Who is Eknath Shinde, What is his importance in politics)
वयाच्या अठराव्या वर्षी एकनाथ शिंदे (Shivsena leader Eknath Shinde) यांनी शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर काही काळातच ते ठाण्यातल्या किसन नगरचे शाखाप्रमुख झाले. १९९७ साली त्यांना ठाणे महापालिका निवडणुकीचं तिकीट मिळालं. त्यानंतर २००४ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. ते निवडून आले आणि तेव्हापासून ते सलग चार वेळा आमदारपदी निवडून आले. त्यांनी २०१५ ते २०१९ पर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. सध्याच्या सरकारमध्ये ते नगरविकास खात्याचा कारभार सांभाळतायत. (Maha Vikas Aghadi Government)
एकनाथ शिंदेंचं शिवसेनेतलं महत्त्व काय?
नम्र, मितभाषी अशी एकनाथ शिंदेंची ओळख आहे. २०१४ च्या निवडणुकीत जेव्हा मोदी लाट आली, त्यावेळी एकनाथ शिंदेंनी ठाण्यातला शिवसेनेचा करिश्मा कायम राखला. आनंद दिघे (Shivsena leader Anand Dighe) यांच्यानंतर शिवसेना टिकवण्यात एकनाथ शिंदेंचं मोठं योगदान मानलं जात आहे. ठाण्यातल्या कोपरी-पाचपाखडी या मतदारसंघातून एकनाथ शिंदे निवडून येत आहेत.
एकनाथ शिंदे हे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागलंय. ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. ते भाजपमध्ये जाणार की स्वत:चा वेगळा पक्ष काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दुपारी 12 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याते ते त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. The rope of Maharashtra alliance government is in the hands of Eknath Shinde
दुपारी पत्रकार परिषद
दुपारी 12 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याते ते त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदें काय भूमिका घेणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय. The rope of Maharashtra alliance government is in the hands of Eknath Shinde
भूमिका काय घेणार
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. ते शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे. ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. ते भाजपमध्ये जाणार की स्वत:चा वेगळा पक्ष काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
हे ही वाचा ——
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टि पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर..
Maharashtra Government Announces Rs 31628 Crore Package for Flood Victims - India -Pak Cricket|”मला त्याला मारायचं…”: पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदचं शिखर धावनवरून वादग्रस्त विधान, भारतीय चाहत्यांचा राग अनावर
“I wanted to boxing him…”: Pakistani spinner Abrar Ahmed’s controversial - आशिया चषक 2025 अंतिम सामना: भारताने पाकिस्तानला हरवून नववा विजेतेपद मिळवला!
दुबई, 28 सप्टेंबर 2025: आशिया चषक 2025 (T20I स्वरूप) चा - मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान: नद्यांना महापूर, शेतीचे मोठे नुकसान
Marathwada Reels Under Torrential Rains and Floods: Massive Crop Damage - निसर्ग संवर्धनासाठी माहूरमध्ये होत आहे पर्यावरण संमेलन; अशी करा नाव नोंदणी
Environment conference organized at Mahur for nature conservation; presence of

