मुंबई : फोडाफोडीचे राजकारण, आघाडीतील घटक पक्षांमधील अस्वस्थता, त्यातूनच दगाफटका आणि आमदारांमधील नाराजीमुळे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाआधीच हैराण झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भलतीच खबरदारी घेतली आहे. पक्षाच्या आमदारांशिवाय विरोधी पक्ष, अपक्ष, छोटे पक्ष यांचे तीन-तीन आमदार फोडण्याचा आदेश आघाडीने आपापल्या उमेदवारांना दिला आहे. त्यामुळे या पक्षाच्या सहा उमेदवारांपुढे स्वतःच्या ताकदीवर १८ मते खेचून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. Maharashtra Legislative Council elections take an interesting turn due to divisive politics: These Moments will be important
या मोहिमेत उमेदवारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ मिळण्याची आशा आहे. विधान परिषदेच्या रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी २६ मतांचा जादुई आकडा गाठावा लागेल. त्यातच माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदान करता येणार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आजघडीला हक्काची ५१ मते उरली मते आहेत. Legislative Council elections take an interesting turn due to divisive politics
मात्र, या पक्षाचे उमेदवार विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांच्या विजयासाठी एक मत कमी आहे. त्यातच भाजपने छुपी रणनीती आखून खडसे यांची वाट रोखण्याचा बंदोबस्त केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाईक-निंबाळकर, खडसे यांना काही करून प्रत्येकी तीन मते फोडण्याचा सूचना केल्या आहेत. Legislative Council elections take an interesting turn due to divisive politics
शिवसेनेकडे ५४ मते असल्याने त्यांचे सचिन अहीर आणि आमशा पाडवी आमदार होऊ शकतात, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरविलेले उमेदवार पाडण्याचा प्रयोग आता विधान परिषदेतही यशस्वी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्याचा फटका पाडवी यांना बसू शकतो. त्यामुळे कोटा पूर्ण होण्याइतपत मते असली तरी; जादा मतांची जुळवाजुळव शिवसेनेसाठीही दिलासा देणारी असेल. काँग्रेसलाही चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप यांना निवडून आणायचेच आहे. त्यात जगताप यांना शक्य तेवढे फिरून मते गोळा करण्यास सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा ——-
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits
- Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला
- देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी