पुणे: राज्यात परीक्षांबबत अनेक घोटाळे समोर येत आहेत. सुरुवातीला आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेला घोटाळा त्यानंतर म्हाडा पेपरफूटी प्रकरण आणि आता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला शिक्षक भरती परीक्षेचा घोटाळा. या प्रकरणी धक्कादायक माहिती अशी की यात एका अधिकाऱ्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. सुशील खोडवेकर असे अटक केलेल्या अधिकारचे नाव असून ते भारत प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.
शिक्षक भरती (TET) प्रक्रियेत सुशील खोडवेकर (Sushil Khodwekar) यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. खोडवेकर हे महाराष्ट्र कृषी खात्यात सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत. नुकतेच त्यांच्याकडे शालेय शिक्षण आणि खेळ विभागाचे (शालार्थ) सहाय्यक सचिव (Deputy Secretary) ही जबाबदारी दिली गेली होती. सायबर पोलिसांच्या (Cyber Police) एका पथकाने त्यांना ठाण्यातून अटक करत शनिवारी कोर्टासमोर हजर केले.
सुशील खोडवेकर यांच्यासह आतापर्यंत ४० आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामधील काही आरोपी हे म्हाडा, आरोग्य भरती मध्येही सहभागी आहेत. २०१८ आणि २०२० मध्ये झालेल्या शिक्षक भरती परीक्षेस सहभागी उमेदवारांपैकी ७,८८० उमेदवारांचे गुण विशेष पद्धतीने वाढवून त्यांना उत्तीर्ण केले गेले होते. पोलिस या सर्व उमेदवारांची यादी पुढील कारवाईसाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठविणार आहे.
Sushil Khodwekar Arrested By Pune Police In Tet Exam Scam
=====================
- देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांचे कल: भाजपचा बंगाल आणि आसाममध्ये दणदणाट, तमिळनाडूत थलपती विजयचा ‘TVK’ चा धमाका
- “मैत्रीचा सापळा आणि ३५० अश्लील व्हिडिओ; परतवाड्याच्या अयान अहमदचा ‘विकृत’ चेहरा समोर, संपूर्ण महाराष्ट्र सुन्न!”
- शिवराय सर्वांचे, फूट कुणाची? अंजनगाव वादातून महाराष्ट्राला धडा,अनधिकृत पुतळे, जातीय तणाव आणि शिवभक्तीची खरी परीक्षा
- समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ३१ दिवसांचे आंदोलन : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासन पुर्णत्वाची प्रतीक्षा, भर उन्हाळ्यात ३३०० कर्मचारी ‘हक्क’साठी रस्त्यावर
- इंडिया पोस्ट ऑफिस GDS भरती २०२६: सविस्तर माहिती – २८,७४० पदांसाठी अर्ज सुरू, १०वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!
