राज्यात 10 लाख गाठींहून कमी उत्पादन.
कापसाचे भाव यंदा सर्रासपणे किमान खरेदी मूल्यापेक्षा (एमएसपी) म्हणजे 6,025 पेक्षा जास्तच राहू शकतात. हरियाणा, पंजाब व मध्य प्रदेशात आताच खासगी खरेदी ही 7,500 पेक्षा अधिक दराने सुरू आहे. यापुढेही याच पातळीच्या वर 7,500 ते 8,000 या दर पट्ट्यातच ही खरेदी सुरू राहू शकते. Cotton will shine white gold this year; Cotton is likely to fetch more than Rs 10,000.
मागणीचा जोर वाढल्यास किंमती रु.10,000 चा टप्पाही गाठू शकतात. सध्या सरकार दरबारी होत असलेल्या नोंदीच्या आधारे, कॉटन फेडरेशन आणि सीसीआय या संस्थांनी सुधारित अंदाज जाहीर केले आहेत. त्यानुसार, यंदा राज्यात 75 लाख गाठींचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविला गेला आहे.
यापूर्वी 85 लाख गाठींचे उत्पादन जाहीर केले गेले होते. नव्या अंदाजासाठी सरकारी पंचनाम्यांचा आधार घेतला गेला आहे. मात्र, प्रत्यक्षात नुकसान पंचनाम्यांहून कितीतरी अधिक आहे. Cotton will shine white gold this year; Cotton is likely to fetch more than Rs 10,000.
कॉटन फेडरेशन व सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र नोव्हेंबरपासून सुरु होणार….
कॉटन फेडरेशनचे महाव्यवस्थापक जे. पी. महाजन यांनी मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात कापसाचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय मागणीबरोबरच देशांतर्गत मागणीही अधिक असल्याने कापसाला यंदा चांगला दर राहील, असे महाजन यांचा अनुमान आहे.
त्यांनी सांगितले, की सरकारी कापूस खरेदी केंद्रे नोव्हेंबरमध्ये सुरू केली जाणार आहेत. कॉटन फेडरेशन राज्यभरात 70 तर सीसीआय विदर्भात 40 खरेदी केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी दोन्ही संस्थांनी मिळून राज्यात 15 लाख गाठींची खरेदी केली होती. मात्र, यंदा खासगी खरेदीचा जोर आणि अधिक भाव यामुळे सरकारी खरेदी कमी राहू सकते. गेल्या वर्षी कोरोना प्रतिबंधामुळे सरकारी खरेदी केंद्रांवर गर्दी होती.
कसे असेल कापसाचे गणित..?
एक क्विंटल कापसापासून 34 किलो रुई व 64 किलो सरकी मिळते.
• 15 सेंट एक पाउंड परळीचा भाव ( 1 बेल = 187 किलो रुई)
• 34 किलो रुईचे (187 x 34 ) = 6363
• 64 किलो सरकीचे 30 रुपये प्रति किलो प्रमाणे 1920 रुपये
• एक क्विंटल कापसाचे 6363 अधिक 1920 म्हणजेच 8250 एकूण प्रक्रिया खर्च व्यापारी नफा 1250 रुपये वजा केले तर सात हजार रुपये होतात. Cotton will shine white gold this year; Cotton is likely to fetch more than Rs 10,000.
=========================================
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits
- Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला
- देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी