या कारणांमुळे अशोक चव्हाणांच्या घरावर केली दगडफेक, तरुणीने केले स्पष्ट
नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील आनंद निलयम या निवासस्थानावर दगडफेक झाल्याची घटना आज सकाळी घडली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांना याचा गांभीर्याने तपास करत दगडफेक करणाऱ्या युवतीला ताब्यात घेतले आहे.
ही तरुणी आज बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास अशोक चव्हाण यांच्या घराजवळ आजारी आईला व्हिलचेअरवर घेऊन आली आणि ‘अशोक चव्हाण आहेत का? मला त्यांना भेटायचे आहे’ म्हणून सुरक्षा रक्षकांना विचारणा केली. सुरक्षा रक्षकांनी ‘साहेब नाहीत’ म्हटल्यानंतर चिडलेल्या तरुणीने गोंधळ घालत निवासस्थानावर दगडफेक केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मात्र तोपर्यंत तरुणी आईसह निघून गेली होती. ही तरुणी उच्च शिक्षित असून तिची मानसिक स्थिती चांगली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या महिलेने केलेल्या दगडफेकीत अशोक चव्हाण यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या केबिनची काच फुटली आहे. या दगडफेकीत कुणालाही दुखापत झालेली नाहीये. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ही तरुणी काबरा नगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. केवळ चव्हाण यांना भेटता आले नाही म्हणून या तरुणीने दगडफेक केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी तरुणी विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दगडफेकीमुळे अनेक तर्क वितर्क लढविले जात होते. मात्र, आता या घटनेला पुर्णविराम मिळाला आहे.
=========================================
- खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री : कुणाल चांदगुडे यांच्या आई संगीता चांदगुडे होत्या युट्युबर; कौटुंबिक वादाचे व्हिडिओ व्हायरल
- छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर कुटुंबाची दुर्दैवी घटना, रागात आणि कौटुंबिक वादात संपूर्ण कुटुंबाचा अंत
- नरेंद्र मोदी यांनी वापरलेला ‘नक्षली दिमाग’ वक्तव्यावरून देशात नवा वाद: राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि लोकशाहीवरील परिणामांचा आढावा
- धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा : विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश NEET पेपर लीक प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी घेतली नैतिक जबाबदारी; प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

