कोल्हापूर: मराठा आरक्षणाचा चेंडू आता राष्ट्रपतींच्या दरबारात जाणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती सर्वपक्षीय खासदारांना घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. येत्या 2 सप्टेंरब रोजी ही भेट होणार आहे. संभाजी छत्रपती यांनी ट्विट करून तशी माहिती दिली आहे. त्यामुळे या भेटीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (sambhaji chhatrapati will meet president ramnath kovind over maratha reservation issue)
राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी भेट मागितली होती. त्यानुसार त्यांनी 2 सप्टेंबर रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी 1 खासदार प्रतिनिधींने उपस्थित रहावे, यासाठी आज सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांना पत्र पाठवली आहेत, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपतींपुढे भावना मांडणार
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविताना राष्ट्रपती व केंद्र सरकार यांची देखील भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने संभाजीराजेंनी राष्ट्रपतींना मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाजाच्या भावना समजावून सांगण्यासाठी वेळ मागितला होता. सोबत महाराष्ट्रातील खासदारांना देखील समवेत भेटीसाठी वेळ दिली जावे असे कळविले होते. आज त्यांनी प्रमुख राजकीय पक्ष, अध्यक्ष, लोकसभा व राज्यसभेतील पक्षीय गटनेते यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे येत्या 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
50 टक्क्यांची मर्यादा हटवणे आवश्यक
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. याबाबत सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींसमोर आपल्या भावना मांडणार आहे. यावेळी राज्यपाल काय सल्ला देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
=======================================================================================
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
- शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेत
- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण
- बंगाल उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्र-विदर्भात वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनची तयारी सुरू
- NEET- UG 2026 Paper Leak प्रकरण | NTA प्रणालीतील विश्वासघात, प्राध्यापकांचा रॅकेट आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
