दहावी ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, विभागनिहाय, श्रेणीनिहाय निकालाची वैशिष्ट्ये, दृष्टिक्षेपात-वाचा सविस्तर
Maharashtra SSC Result 2021 announced, 99.95 percent students passed, division wise, grade wise results features, results in sight
Maharashtra SSC Result 2021: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल (Class x Result) जाहीर झाला आहे. एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात (Maharashtra Board) प्रथमच अशा पद्धतीने परीक्षा अशा पद्धतीने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांचे दहावीचे मूल्यांकन त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन अधिक नववीचा वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारे करण्यात आले आणि निकाल जाहीर करण्यात आला.
राज्यातून १५ लाख७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांचे गुण शाळांकडून मिळाले, त्यापैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९९.९५ आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे.दृष्टिक्षेपात निकाल –परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी – १७ लाख ६५ हजार ८९८
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी – १५ लाख ७४ हजार ९९४
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी – ९९.९५ टक्के निकालाची वैशिष्ट्ये –– निकालात मागील वर्षीच्या तुलनेत ४.६५ टक्के वाढ
– कोकण विभाग अव्वल, १०० टक्के निकाल
– ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
– नागपूरचा निकाल सर्वात कमी
– यंदाही मुलींचीच बाजी
– राज्यात केवळ ३६८ विद्यार्थ्यांना एटीकेटी
विभागनिहाय टक्केवारी
कोकण – १०० टक्के
पुणे- ९९.९६ टक्के
नागपूर – ९९.८४ टक्के
औरंगाबाद – ९९.९६ टक्के
मुंबई- ९९.९६ टक्के
कोल्हापूर -९९.९२ टक्के
अमरावती – ९९.९८ टक्के
नाशिक – ९९.९६ टक्के
लातूर – ९९.९६ टक्के
पुढील थेट लिंकवर निकाल उपलब्ध – http://result.mh-ssc.ac.in www.mahahsscboard.in
श्रेणीनिहाय निकाल श्रेणी – विद्यार्थी संख्या विशेष प्राविण्य (डिस्टिंक्शन) – ६,४८,६८३
प्रथम श्रेणी – ६,९८,८८५
द्वितीय श्रेणी – २,१८,०७०
उत्तीर्ण श्रेणी – ९,३५६
खासगी विद्यार्थ्यांचा निकाल – खासगी विद्यार्थी म्हणून २८,४२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांच्या निकालाची टक्केवारी ९७.४५ आहे. श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणीकृत विद्यार्थ्यांचा निकाल नाही ज्या विद्यार्थ्यांनी २०२१-२२ या वर्षीच्या परीक्षेसाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केली होती, त्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही, असे मंडळाने कळवले आहे. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नसल्याने या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील, असे मंडळाने स्पष्ट केले आहे
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टि पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर..Maharashtra Government Announces Rs 31628 Crore Package for Flood Victims राज्यातील अतिवृष्टीमुळे लाखों
- India -Pak Cricket|”मला त्याला मारायचं…”: पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदचं शिखर धावनवरून वादग्रस्त विधान, भारतीय चाहत्यांचा राग अनावर“I wanted to boxing him…”: Pakistani spinner Abrar Ahmed’s controversial statement on Shikhar
- आशिया चषक 2025 अंतिम सामना: भारताने पाकिस्तानला हरवून नववा विजेतेपद मिळवला!दुबई, 28 सप्टेंबर 2025: आशिया चषक 2025 (T20I स्वरूप) चा अंतिम सामना भारत
- मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान: नद्यांना महापूर, शेतीचे मोठे नुकसानMarathwada Reels Under Torrential Rains and Floods: Massive Crop Damage Reported मुंबई, २