Health Benefits Of Meditation | योग ध्यान का केलं जातं ? जाणून घ्या फायदे
अनेक घरांमध्ये आजही तुम्ही आजी-आजोबा किंवा वडिलधाऱ्या मंडळींना ध्यान (meditation) करताना पाहिलं असेल. आता प्रत्यक्षात पाहताना ध्यान करणारी व्यक्ती फक्त मांडीवर हात ठेऊन डोळे मिटून बसलेली असते. त्यामुळे अनेकदा हे काय नुसतं बसणं असा प्रश्न या ज्येष्ठ मंडळींना विचारला जातो. परंतु, तुम्हाला खरंच ध्यान करणं म्हणजे काय माहित आहे का? ध्यान करणं म्हणजे केवळ डोळे मिटून बसणं नव्हे. तर, आपल्या अस्वस्थ आणि सतत बडबड करणाऱ्या मनाला शांत करणे.
एखादा दिवस तुम्ही कोणाशीही बोलला नसाल. पण, तुम्ही मनातल्या मनात स्वत:शीच हजारो गप्पा मारल्या असणार. आपण सगळेच आपल्या मनाशी खूप बोलत असतो. मात्र, त्या मनालादेखील शांत करण्याची गरज असते. त्यामुळेच ध्यान करणं अत्यंत गरजेचं आहे. ध्यान केल्यामुळे केवळ अस्वस्थ मन शांतच होतं असं नाही. तर, त्याचसोबत त्याचे अन्यही काही फायदे आहेत. हे फायदे कोणते ते जाणून घेऊयात. (health Benefits of meditation)
ध्यान करण्याचे फायदे –
१. ध्यान केल्यामुळे रक्तातील स्ट्रेस हॉर्मोन ‘कॉर्टिसोल’ आणि ‘कॅटेकोलोमीन’चे प्रमाण कमी होते. २. ध्यानाने ‘प्रोलॅक्टीन’ हॉर्मोन वाढते जे आपल्या रोगप्रतिकार शक्तीचे कार्य सुरळीत ठेवते. ३. ध्यानाने ‘अँटीबॉडी टायटर’ वाढतात. त्यामुळे रोगांवरचे उपाय आणि इलाज यांना आपले शरीर चांगल्याप्रकारे प्रतिसाद देऊ शकते.
४. नियमित ध्यान केल्यास आपल्या मेंदूतील ‘अमिगडाला’ नावाचा भाग शांत होतो. हा भाग म्हणजे चिंता, भीती, काळजी यांचं केंद्र आहे. ५. ध्यानाची खोली वाढत जाईल तसे मेंदूचे reconstruction होऊ लागते आणि शरीरात झालेल्या बिघाडांचे रिपेअरिंग व्हायला सुरू होते. परंतु जोपर्यंत शरीर आणि मन स्थिरतेच्या आड येत राहील, तोपर्यंत ध्यानाची क्वालिटी वाढणार नाही. यासाठी हठयोगात सांगितलेल्या शुद्धीक्रिया, आसन, प्राणायाम उपयोगी ठरतील.
ध्यान का करावं?
शरीराच्या अनेक व्याधी या disturbed mind functions मुळे होतात. दृश्यस्वरूपात शरीरावर या disturbance चे मात्र प्रकटीकरण होत असतं. स्ट्रेस, सतत डोक्यात चालू असलेला विचारांचा गदारोळ, चिडचिडेपणा, भीती, आकांक्षा-अपेक्षांचं ओझं या आणि अशा अनेक कारणांनी मेंदू सतत बिझी राहतो आणि म्हणून थकतो. पण त्याच मेंदूवर आपल्या शरीराचे इतर सर्व कार्य सुरळीत चालू ठेवण्याचीही जबाबदारी असते. म्हणूनच आपल्या मेंदूचे function अतिशय balanced आणि harmonious ठेवणे हे व्याधीरहित जीवनाचं गमक आहे. नियमित ध्यान केल्याने मेंदूतील वैचारिक व भावनिक केंद्रे शांत राहतात.
या शांततेत झालेले मेंदूचे कार्य हे उच्चप्रणालीचे असते यात शंका नाही. प्राणायाम व ध्यानाने मेंदूचे अक्षरशः reprogramming आणि reconditioning होऊन मेंदूत सूक्ष्म बदल होऊ लागतात. ध्यान करण्याकडे अनेक जण अध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहतात. त्यामुळे या ध्यानापासून काही जण लांब राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ध्यान करण्यामागील शास्त्रीय कारण पाहिलंत तर नक्कीच त्याचं महत्त्व साऱ्यांना कळेल
—–हे ही वाचा—–
- महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा: SIT ची स्थापनामुंबई, 31 जुलै 2025: बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्येप्रकरणी तब्बल 18
- या कारणामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्ततामुंबई, 31 जुलै 2025: मालेगाव येथील 2008 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कोर्टाने
- सैय्यारा (2025): प्रेम, वेदना आणि विस्मरणाच्या प्रवासाची संगीतमय कथाSaiyyaraa (2025): A musical tale of a journey of love, pain and oblivion मुंबई | 2025:
- 9 वे पर्यावरण संमेलन 2025 ला नांदेड जिल्हाधिकारी यांची उपस्थिती लाभणार; जिल्हाधिकारी यांना पर्यावरण मंडळाच्या वतीने निमंत्रणNanded District Collector To Attend 9th Environment Conference 2025 Invited By Nisarga Samajik Paryavaran Nivaran Mandal
- मुंबई महाराष्ट्र विधानभवनात आमदार पडळकर-आव्हाड कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, ही आहे वादाची पार्श्वभूमीClash at Mumbai’s Maharashtra Vidhan Bhavan: Padalkar-Awhad Supporters Engage in Fierce Brawl मुंबई, १७ जुलै २०२५