How to file online complaint of SBI | अशी करा कामचुकार बँक कर्मचाऱ्यांची तक्रार

How to file online complaint of SBI | अशी करा कामचुकार बँक कर्मचाऱ्यांची तक्रार

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखांमध्ये अनेकदा योग्यप्रकारे काम सुरु नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ग्राहक अनेकदा याबाबत तक्रारीही करतात. मात्र, या सगळ्यावर चर्चा आणि थट्टेपलीकडे फारसे काही घडत नाही. (How to file online complaint of SBI employee or branch manager)

SBI branch | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर संबंधित कर्मचाऱ्याविरोधात तक्रार करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे आता बँकेचे ग्राहक कोणत्याही कर्मचाऱ्याने योग्य वागणूक किंवा सहकार्य न केल्यास एसबीआयच्या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात.

मात्र, SBI बँकेने आपल्या कामुचकार कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर संबंधित कर्मचाऱ्याविरोधात तक्रार करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे आता बँकेचे ग्राहक कोणत्याही कर्मचाऱ्याने योग्य वागणूक किंवा सहकार्य न केल्यास एसबीआयच्या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात.
कर्मचाऱ्याची तक्रार कशी कराल?

बँकेच्या कर्मचाऱ्याची तक्रार करण्यासाठी https://cms.onlinesbi.com/CMS याठिकाणी जाऊन तक्रार नोंदवता येईल. संकेतस्थळावर गेल्यानंतर General Banking पर्याय क्लिक करावा, त्यानंतर Branch Related पर्याय निवडावा. त्यामध्ये तुम्ही आपली तक्रार नमूद करु शकता. आता या तक्रारींची बँकेकडून कितपत दखल घेतली जाणार, हेदेखील पाहावे लागेल.

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice