Pandarichi Wari | पंढरीची वारी म्हणजे अलौकिक आनंदाची अनुभूती
वारी पाहण्याचा , लिहीण्याचा विषय नाही . वारी अनुभवण्याचा विषय आहे . मुळात हा विषयच नसून एक अलौकिक अनुभूती आहे . काही महिन्याच्या बाळापासून ते वयाची नव्वदी अोलांडलेली सारी माणसं ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात एकरुप होऊन जातात . जात , पंथ , धर्माचे सारे भेद इथं गळून पडतात . इथल्या वाटेवर कोणीही कोणाला नावाने हाक मारत नाही . जोपर्यंत वारीच्या वाटेवर आहात तोपर्यंत तुमचं नाव केवळ ‘ माऊली ‘ आहे . इथं प्रत्येकजण एकमेकांना माऊली नावाने हाका मारतो . अोळखपत्र लागत नाही . चेहर्यावर विलसत असलेलं माऊलींच्या नामाचं हास्यच इथली अोळख !
माऊलींच्या आधी इथं ‘ एक गुरु – एक शिष्य ‘ परंपरा होती . गुरुने आपलं ज्ञान केवळ एकाच शिष्याला अाणि त्याने केवळ त्याच्याच शिष्याला द्यायचं . ही परंपरा निवृत्तीनाथांपर्यंत आली . नाथांनी ज्ञानेश्वरांना ते ज्ञान सांगितलं . आणि ज्ञानोबांनी मात्र ; ते सार्या जगासोबत वाटलं . वारकरी सांप्रदायाचा पाया रचला . भेदाभेद महापाप मानलं . म्हणून माऊलींचा मान सार्या संतांमध्ये अधिक . माऊलींनी रचलेल्या ज्ञान आणि प्रेमाच्या मंदीराला तुकोबांनी कळस चढविला . म्हणून ज्ञानोबा – तुकाराम चा गजर होतो ह्या वाटेवर …
कोणाला आमंत्रण दिल्या जात नाही . भर पावसातही एखाद्या तरुण रक्ताला लाजवेल अशी पाऊलं खेळतात ही वृद्ध माणसं . कुठून येत असेल हे तेज ? हे तेज आहे भक्तीचं अाणि श्रद्धेचं . ईश्वर म्हटलं की , केवळ अंधश्रद्धा म्हणून पाहणार्या लोकांनी ह्या वृद्धांसोबत व्यतीत करावा काही काळ वारीच्या वाटेवर . आनंद म्हणजे काय ? भक्ती म्हणजे काय ? ह्या सार्यांची उत्तर मिळत जातील . वारी ही आपल्या आत होणारं परिवर्तन आहे . पंढरीसे जारे आल्यानो संसारा ॥ असं संत सांगतात त्यामागचं कारण भव्य आहे . हा काही दिवसांचा प्रवास सांगतो आपल्या आत्म्याला की , आहे ! आहे अजूनही ह्या विश्वात प्रेम , स्नेह , आपुलकी , दया आणि कैवल्य , साहस आणि विश्वास .. ह्या सार्या भावना वारीत प्रत्यक्ष कोणा न कोणाच्या रुपाने वावरतात . .
ह्यावर्षी वारीची वाट सुनीसुनी राहणार . काल जगद्गुरू तुकोबांचं प्रस्थान झालं . आज विश्वमाऊली ज्ञानोबांच प्रस्थान . मोजक्याच काही संताच्या पालखी ह्यावेळेस पंढरपुरात दाखल होतील . बा विठ्ठला ! लढण्यास बळ दे फक्त ..
स्वत:शी अोळख करुन घेण्यासाठी , वारीसारखा प्रवास दुसरा कोणता नाही .
———— हे ही वाचा ———–
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टि पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर..Maharashtra Government Announces Rs 31628 Crore Package for Flood Victims राज्यातील अतिवृष्टीमुळे लाखों शेतकऱ्यांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं.
- India -Pak Cricket|”मला त्याला मारायचं…”: पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदचं शिखर धावनवरून वादग्रस्त विधान, भारतीय चाहत्यांचा राग अनावर“I wanted to boxing him…”: Pakistani spinner Abrar Ahmed’s controversial statement on Shikhar Dhanu, angers Indian fans दुबई/मुंबई,
- आशिया चषक 2025 अंतिम सामना: भारताने पाकिस्तानला हरवून नववा विजेतेपद मिळवला!दुबई, 28 सप्टेंबर 2025: आशिया चषक 2025 (T20I स्वरूप) चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय
- मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान: नद्यांना महापूर, शेतीचे मोठे नुकसानMarathwada Reels Under Torrential Rains and Floods: Massive Crop Damage Reported मुंबई, २ ऑक्टोबर २०२५: महाराष्ट्रातील मराठवाडा आणि
- निसर्ग संवर्धनासाठी माहूरमध्ये होत आहे पर्यावरण संमेलन; अशी करा नाव नोंदणीEnvironment conference organized at Mahur for nature conservation; presence of Padma Shri Shabir Mamu माहूर, १ ऑक्टोबर २०२५