Online Team | पंढरपुर येथे होत असलेल्या आषाढी वारी सोहळ्यावर कोरनाचे सावट कायम आहे. आषाढी वारीसाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या सह मानाच्या दहा पालखी सोहळे एसटीतूनच पंढरपुरला जाणार आहेत. एका पालखी सोहळ्यासाठी दोन वाहने असुन प्रत्येक वाहनात तीस लोक असतील. राज्य मंत्रीमंडळात हा निर्णय घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी सांगितली.
पालखी सोहळ्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, कोल्हापुर, सातारा, पुणे, कोल्हापुर, सोलापुर या जिल्ह्यातील पोलिस खाते व प्रशासनातील अधिकारी यांची समिती केली होती. आषाढी वारीबाबत समिती व वारकरी सांप्रदायातील लोकांसोबत पालखी सोहळ्याविषयी बैठक झाली. यंदा परवानगी देण्याची अग्रही मागणी होती. मात्र यंदाही कोरोनाचे संकट गंभीर असल्याने आम्ही त्यांना सर्व बाबी समजून सांगितल्या व मंत्री मंडळाने काही बदल करुन निर्णय घेतले आहेत.
आषाढीसाठी असलेल्या प्रमुख दहा मानाच्या महत्वाच्या पालख्यांना आषाढी वारीला जाण्याला परवानगी दिली. गेल्यावर्षी दहा मानाच्या पालख्यांना प्रत्येकी प्रस्थान सोहळ्या करिता 20 वाऱ्यांना उपस्थितीची परवानगी दिली होती. यावेळी देहू येथील संत तुकाराम महाराज व आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाकरिता 100 लोकांना परवानगी लोकांना उर्वरित आठ मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येक 50 लोकांना परवानगी दिली आहे. हे तेथील कार्यक्रमासाठी आहे. हे लोक पालखी घेऊन चालत जाणार नाहीत.
मागील वेळी प्रत्येक एक एसटी दिली होती. यावेळी प्रत्येकी दोन एसटी गाड्या द्यायचे ठरले आहे. मानाच्या पालखी सोहळ्याचा पंढरपुर येथील मुक्काम व कालावधी दशमी दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान होण्याचे प्रस्थावीत केलेले आहे. पालख्याची वाहने वाखरी येथे पोचल्या नंतर तेथून पंढरपुरकडे दिड किलोमीटर अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी करण्याला मान्यता दिली आहे. दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यासाठी अजून मंदिर समितीकडून अहवाल नाही, त्यामुळे त्याबाबत सध्या तरी सरकारने जारी केलेले नियम लागू असतील.
शासकीय महापुजा गतवर्षीप्रमाणे होईल. विठ्ठलास संताच्या भेटी पाच भाविकांना सोडले जाईल. भाविकांसाठी दर्शन बंदच राहणार आहे. विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक सोळा लोक सहभागी असतील. हा सोहळा साध्या पद्धतीत असेल. महाद्वार काल्यात सहभागासाठी आकरा लोक असतील. त्या लोकांची वैद्यकीयतपासणी असेल. दिंडी प्रदक्षिणेला केवळ पाच लोक असतील. नामदेव महाराज समाधी सोहळ्यात आकरा व्यक्ती असतील.
हे ही वाचा ः
- धनंजय मुंडे यांना तात्काळ मंत्रीपदावरुन हटवा अजित पवार समोर मस्साजोग गावकऱ्यांचा टाहोबीड केज तालुक्यातील मस्साजोग येथे आवदा पवनचक्की उर्जा कंपनीचे मध्यवर्ती कार्यालय व गोडाऊन यार्ड असलेल्या ठिकाणी कंपनीच्या खंडणी प्रकरणावरून मस्साजोग … Read more
- Devendra Fadnavis say on Santosh Deshmukh Case पाळेमुळे उखडून टाकू, वाल्मिक कराडला सोडणार नाही; दोन प्रकारची चौकशी. आयजी अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी व न्यायालयीन चौकशी.काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?हे प्रकरण बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येपुरते मर्यादित नाही. या प्रकरणाची मुळे खणून काढावी लागतील. बीड जिल्ह्यातील … Read more
- खासदार प्रतापचंद्र सारंगी हे जखमी; भाजपच्या खासदाराने मला मारल,धक्काबुक्की करत होते- राहुल गांधीभारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार प्रतापचंद्र सारंगी हे गुरुवारी जखमी झाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुसऱ्या खासदाराला धक्का दिल्याने … Read more
- व्हाट्सअप फीचर्स अपडेट मध्ये आले 4 नवीन बदल; वापरकर्ता या सुविधेमुळे व्हिडिओ, ऑडिओ कॉल सह होणार हे फायदेव्हॉट्सॲपकडे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलसाठी नवीन अपडेट आहेत, ज्यात सहभागी निवड आणि विस्तारित व्हिडिओ प्रभाव समाविष्ट आहेत. डेस्कटॉप कॉलिंगचा अनुभव … Read more