Online Team : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 28 मे रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत निकष जाहीर केले. त्यानंतर त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. शाळांना शासनानं ठरवून दिलेल्या माध्यमिक शाळांकडून काम सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये जाहीर होणार आहे. शाळांकडून दहावीच्या निकालसंदर्भातील शासन निर्ण्ययानुसार गुण नोंदवण्यात येत असल्याची माहिती आहे. (Maharashtra SSC Result MSBHSE ssc exam result ma be declare on second week of july)
दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या अंतर्गत लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रकल्प आणि नववीच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याच सूत्र निश्चित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं शासन निर्णयाच्या अधीन राहून दहावीचा निकाल वस्तूनिष्ठचं असायला हवा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत. प्रक्रियेचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
असा लावणार दहावीचा निकाल ?
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी आणि 10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट 2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जुलै महिन्यात जाहीर होईल, असं म्हटलं होतं.
i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.
ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.
iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य सरकारनं निश्चित केलेल्या निकषाप्रमाणे वस्तूनिष्ठपणे निकाल जाहीर करावा, अशा सूचना बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत. मूल्यमापन पद्धतीच्या नियमांचा भंग केल्यास शाळांवर कारवाई होणार आहे. मुल्यमापनात फेरफार झाल्यास शाळांची मान्यताच होणार रद्द किंवा शाळेचा सांकेतिक क्रमांक बोर्डाकडून काढून घेण्यात येणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी शाळास्तरावर समिती स्थापन करावी लागणार आहे. या समितीमध्ये मुख्याध्यापकांसह शाळेतील शिक्षकांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांचा नववीचा निकाल ,दहावीच्या मूल्यमापनाची कागदपत्रे आणि उत्तरपत्रिका निकाल समितीच्या पडताळणीनंतर मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवावे लागणार आहेत. शाळास्तरावर निकालाची तपासणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत होणार आहे.दहावीच्या मूल्यमापनासंदर्भात माध्यमिक बोर्डाकडून शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- पाकिस्तानवर ड्रोन हल्ले, नऊ शहर बाधित, रडार सिस्टीम उध्वस्त- आंतकियोसे का बदला ऑपरेशन सिंदूर जारी है..!पाकिस्तानात ड्रोन हल्ले: तणाव वाढला आज, गुरुवार, ८ मे २०२५ रोजी, “ऑपरेशन सिंदूर” नंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या…
- Operation Sindoor | टारगेट कसे सेट केले ऑपरेशन सिंदूर बद्दल तुम्हाला हे माहित आहे का?Operation Sindoor सविस्तर माहिती ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सशस्त्र दलांनी बुधवार, ७ मे २०२५ रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीर…
- Maharashtra Local Body Election| चार महिन्यात निवडणुका घ्या कोर्टाने सुनवले, स्थानिक स्वराज्य संस्थांत निवडणूकाचा धुराळा उडणारस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. (Maharashtra Local Body Election )कारण येत्या चार महिन्यात निवडणुका घ्या, असे…
- Cast Census In India | जात जनगणना म्हणजे काय आणि ती भारतासाठी का महत्त्वाची आहे?नवी दिल्ली: १८८१ ते १९३१ पर्यंत ब्रिटिश राजवटीत जातींची गणना ही जनगणनेचा एक नियमित भाग होती. तथापि, १९५१ मध्ये…