शिवराज्यदिना निमित्त भगवाध्वज उभारण्यास विरोध. आदेश रद्द करा. अथवा सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेईल.
मुंबई :- 04 जून : रविवारी असलेल्या शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din) सोहळ्याच्या मुद्द्यावरून एक नवा वाद समोर आला आहे. संपूर्ण राज्यात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागानं ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये हा सोहळा साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. यादिवशी भगवा ध्वज (Orange Flag) असलेली गुढी उभारली जाणार आहे. पण त्याला अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी (Advocate Gunratna Sadavarte) विरोध केला आहे. त्यामुळं आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्यात 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिना साजरा होणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे आदेश ग्रामविकास विभागानं दिले आहेत. यासाठी एक विशेष ध्वजही तयार करण्यात येत आहे. शिवशक, राजदंड आणि स्वराज्याची गुढी उभी करण्यात येणार आहे. गुढीला भगवा स्वराज्य ध्वजसंहिता लावण्यात येणार आहे.
दरम्यान, सरकारच्या या आदेशाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला आहे. शासकीय कार्यालयांमध्ये तिरंग्याच्या व्यतिरिक्त कोणताही ध्वज लावण्यास परवानगी नसते. हा प्रकार देशाच्या एकसंधतेचा अवमान करण्याचा आणि संविधानाची पायमल्ली करणारा असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. त्यामुळं हा आदेश रद्द करावा आणि तो काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तशीच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सदावर्तेंनी केली आहे. हा प्रकार म्हणजे देशद्रोह असून जर हा आदेश मागं घेतला नाही, तर सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेईल असे स्टेटमेंट गुणरत्न सदावर्ते यांनी केले .
- खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री : कुणाल चांदगुडे यांच्या आई संगीता चांदगुडे होत्या युट्युबर; कौटुंबिक वादाचे व्हिडिओ व्हायरलNew Twist in Khavdya Dongar Tragedy: Kunal Chandgude’s Mother Was a YouTuber; Family Dispute Videos Go Viral छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या
- छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर कुटुंबाची दुर्दैवी घटना, रागात आणि कौटुंबिक वादात संपूर्ण कुटुंबाचा अंतHeartbreaking Tragedy at Khavdya Dongar: Son Jumps, Parents Die Trying to Save Him छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज MIDC परिसरातील तिसगाव
- नरेंद्र मोदी यांनी वापरलेला ‘नक्षली दिमाग’ वक्तव्यावरून देशात नवा वाद: राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि लोकशाहीवरील परिणामांचा आढावाM Modi’s ‘Naxali Dimag’ Remark Sparks Debate: A Look at Political Fallout & National Security पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेला
- धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा : विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश NEET पेपर लीक प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी घेतली नैतिक जबाबदारी; प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभारनवी दिल्ली, २६ जुलै : राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET-UG) पेपर लीक प्रकरण आणि परीक्षा पद्धतीतील अनियमिततेमुळे देशभरात उफाळलेल्या विद्यार्थी असंतोषाच्या
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीनवी दिल्ली/पुणे, १९ जुलै २०२६: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या युवा आंदोलकांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील

