Cotton | कापुस लागवड चालु आहे. कृषी विद्यापीठाचा फायद्याचा सल्ला वाचल का ?
राहुरी (जि. नगर) ः पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी कापुस लागवड, पेरणीची तयारी केलीय. चांगला व पुरेसा पाऊस झाला तर 15 जूनपर्यत बीटी कापसाची लागवड करायला हरकत नाही असा सल्ला राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान विभागाने दिलाय.
खरिप हंगाम सुरुच होतोय. खरिपात बहूतांश शेतकरी प्रामुख्याने सोयाबीन, बाजरी, तुर, उडीद, मुग, भुईमुग, मका ची पेरणी करतात. सध्या शेतकऱी खरिपाची तयारी करत आहेत. अजून मान्सुनचा पाऊस यायचाय, पण पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पुर्वमोसमी पावसाची शक्यता आहे.
चांगला पाऊस पडला तर बीटी कापसाची लागवड करायला हरकत नाही. कापुस लागवड 90 बाय 90 सेंटीमीटर किंवा 120 बाय 60 सेंटींमीटर अंतरावर लागवड करावी. हेक्टरी 10 टन शेणखत घालावे. रसशोषणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी रस शोषणार्या किडींच्या नियंत्रणासाठी कपाशीभोवती एक मीटर अंतरावर मका व चवळीची एका आड एक लागवड करावी. तसेच कपाशीच्या प्रत्येक ९ व्या ओळीच्या दुसर्या बाजूस मका, चवळी व राळा या पिकांची लागवड करावी.
पावसात घ्या काळजी
पावसाची शक्यता असल्याने, कापणी केलेली पिके शेडमध्ये किंवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत. वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने, फळ पिकाचे संरक्षण करण्यासाठी बांबू किंवा लाकडी काठ्याचा आधार देऊन प्लॅस्टिक दोरीच्या सहाय्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत जनावराना उघड्यावर चरावयास पाठवु नये, तसेच त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे तसेच झाडाखाली बांधु नयेत. जनावरे गोठ्यात बांधावीत आणि चारा उपलब्ध करुन द्यावा.
शेडमध्ये पाणी साचू नये याची काळजी घ्यावी. जर पाणी साठलेल्या कोरड्या चार्यावर पडले आणि बुरशीचे आक्रमण आढळले तर तो चारा जनावरांना देवु नये. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल अॅपचा वापर करावा. वीजेच्या अंदाजाचा पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल अॅपचा वापर करावा असे विद्यापीठाने सांगितलेय.
हे ही वाचा :
- महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा: SIT ची स्थापनामुंबई, 31 जुलै 2025: बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्येप्रकरणी तब्बल 18 महिन्यांनंतरही आरोपींना अटक न झाल्याने या प्रकरणाने
- या कारणामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्ततामुंबई, 31 जुलै 2025: मालेगाव येथील 2008 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कोर्टाने सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
- सैय्यारा (2025): प्रेम, वेदना आणि विस्मरणाच्या प्रवासाची संगीतमय कथाSaiyyaraa (2025): A musical tale of a journey of love, pain and oblivion मुंबई | 2025: प्रतिनिधी | (न्यूज महाराष्ट्र व्हाईस )बॉलीवूडमध्ये संगीतमय
- 9 वे पर्यावरण संमेलन 2025 ला नांदेड जिल्हाधिकारी यांची उपस्थिती लाभणार; जिल्हाधिकारी यांना पर्यावरण मंडळाच्या वतीने निमंत्रणNanded District Collector To Attend 9th Environment Conference 2025 Invited By Nisarga Samajik Paryavaran Nivaran Mandal माहुर प्रतिनिधी:- नांदेड जिल्हा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
- मुंबई महाराष्ट्र विधानभवनात आमदार पडळकर-आव्हाड कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, ही आहे वादाची पार्श्वभूमीClash at Mumbai’s Maharashtra Vidhan Bhavan: Padalkar-Awhad Supporters Engage in Fierce Brawl मुंबई, १७ जुलै २०२५ – महाराष्ट्र विधानभवनात आज, गुरुवारी सायंकाळी एक