महाराष्ट्रात होणार पंच्याहत्तर हजार रिक्त पद भरती प्रक्रिया मंत्रीमंडळ निर्णय – मुख्यमंत्र्यांचे गती देण्याचे निर्देश

महाराष्ट्रात होणार पंच्याहत्तर हजार रिक्त पद भरती प्रक्रिया मंत्रीमंडळ निर्णय – मुख्यमंत्र्यांचे गती देण्याचे निर्देश
https://youtu.be/AiIP1h6E3f4
https://youtu.be/BB_jiwYLA_s

मुंबई, दि. २९ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात आज १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. 75 thousand vacancy recruitment process to be held in Maharashtra Cabinet Decision – Chief Minister’s instructions to speed up

रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाने १४ विभागांचा सखोल आढावा घेऊन सूचना दिल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यभरातील लिपिक-टंकलेखक या पदासाठी पदभरती होणार आहे. यासदंर्भातील जाहिरात जानेवारी २०२३ मध्ये पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. या अनुषंगाने १५ डिसेंबरपर्यंत सर्व विभागांनी आपले मागणीपत्र आयोगाकडे पाठवलीच पाहिजेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

रिक्त पदांची भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी यापूर्वीच काही निर्णय घेण्यात आले आहेत. आकृतीबंध अंतिम झालेल्या विभागांना सरळसेवा कोट्यातील १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली असून आकृतीबंध अंतिम नसलेल्या विभागांना सरळसेवा कोट्यातील ८० टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अराजपत्रित गट-ब, गट- क व गट-ड मधील पदे टीसीएस व आयबीपीएस या कंपन्यांमार्फत परीक्षा घेऊन भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या सर्व प्रशासकीय विभागांना पदभरती लवकर करण्याच्या अनुषंगाने निर्देश आले असून आढावाही घेण्यात येत आहे. बिंदूनामावली प्रमाणित नसल्याने होणारा विलंब टाळण्यासाठी सर्व विभागीय कार्यालये, मागासवर्ग कक्ष यांना व्हीसीद्वारे बिंदूनामावली तत्काळ तपासून देण्यास सांगितले आहे. 75 thousand vacancy recruitment process to be held in Maharashtra Cabinet Decision – Chief Minister’s instructions to speed up

https://youtu.be/WQTmXAgCtRQ

https://youtu.be/WQTmXAgCtRQ

https://youtu.be/AiIP1h6E3f4
<

Related posts

Leave a Comment