मराठा आरक्षणमहाराष्ट्र

मराठा आरक्षणाचे हत्यारे सेव्ह मेरिट सेव्ह नेशन गँग. सर्व जैन मारवाडी ब्राह्मण

www.newshmaharashtravoice.com

फोटोतील व्यक्ती आहे डॉ. अनुप मरार. विदर्भाच्या भाजप डॉक्टर सेलचे विद्यमान समन्वयक आणि सेव्ह मेरिट सेव्ह मेरिट नेशन फाऊंडेशनचे मुख्य ट्रस्टी. हायकोर्टात मराठा आरक्षणाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर सेव्ह मेरिट फाऊंडेशन ट्रस्टची चॅरीटी कमिशनरकडे अधिकृतपणे नोंदणी करण्यात आली. त्यांच्याकडून राज्यभर आरक्षणाच्या विरोधात मोर्चे काढले गेले. या मोर्चात सेव्ह मेरीटचे प्रमुख म्हणून अनुप मरार हे देखील सहभागी होते.

पुढे सुप्रीम कोर्टात सेव्ह मेरिट फाऊंडेशनच्या देवेंद्र जैन, रुचिता कुलकर्णी, मधुश्री जेथलिया या तिघांनी मराठा आरक्षणाविरोधात यीन याचिका दाखल केल्या. मराठा आरक्षणाविरोधात या याचिकाकर्त्यांकडून सेव्ह मेरिट फाऊंडेशनच्या वतीने अरविंद दातार यांच्यासारखे मोठे वकील देण्यात आले. दहा-बारा याचिकाकर्त्यांपैकी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कुणी विरोध केला असेल तर तो या सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या वकीलांनी. गायकवाड अहवालातल्या त्रूटी, 102 वी घटनादुरुस्ती, इंद्रा साहनी-जर्नेलसिंगसारखे खटले, मराठा समाजातील लोकप्रतिनिधी नोकरदार यांची आकडेवारी इत्यादी मराठा आरक्षणाबद्दलच्या नकारात्मक बाबी याच वकिलांनी सुप्रीम कोर्टासमोर मांडल्या.

हा सर्व डाटा सेव्ह मेरीटवाल्यांना मंत्रालयातील उच्चवर्णीय आधिकारी व काही राजकीय नेत्यानीं पुरवला गेला असावा कारण त्यांच्याकडे डाटा उपल्बध होण्याचा सोर्स मंत्रालय हेच आहे. तसेच या कायदेशीर प्रक्रीयेत लागणारा पैसा सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ट्रस्टकडून दिला गेला. चॅरीटी कमिशनरकडे नोंदणीकृत असणाऱ्या या सेव्ह मेरिट ट्रस्टचे एकूण 7 सदस्य आहेत. पैकी भाजपचे पदाधिकारी असणारे अनुप मरार हे त्यातील प्रमुख ट्रस्टी आहेत. कारण संबंधीत ट्रस्टच्या व्यवहार व संपर्कासाठी अनुप मरार यांचे नाव देण्यात आले आहे. 2020 मध्ये या ट्रस्टकडे लाखो रुपये फंड जमा झाला होता. ही सगळी माहिती चॅरीटी कमिशनरच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

या सेव्ह मेरिटचे इतरही सदस्य संघ-भाजपमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सक्रीय आहेत. CAA-NRC कायद्याच्या समर्थनातील रॅली असो किंवा संघ-भाजपचे मेळावे कार्यक्रम, हे सेव्ह मेरिटचे बहुतेक सर्व ट्रस्टी त्यात सहभागी असतात. नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटल ही एक यातील कॉमन गोष्ट आहे. या सात ट्रस्टींमधले तिघे चौघे या हॉस्पिटलशी निगडीत आहेत. यात अजून एक कॉमन गोष्ट अशी की जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या ज्या Embedded Creations ने वेबसाईट बनवल्या त्याच Embedded Creations ने सेव्ह मेरिट मेरिट सेव्ह नेशनची वेबसाईट बनवली आहे. तसेच या सेव्ह मेरिट फाऊंडेशनचे सर्व ट्रस्टी हे नागपूरचे आहेत आणि नागपूरच्या चॅरीटी कमिशनरकडेच या ट्रस्टची नोंदणी झालेली आहे. भाजपचे पदाधिकारी आणि सेव्ह मेरिट फाऊंडेशनचे ट्रस्टी असणारे अनुप मरार ज्यांनी मराठा आरक्षणाविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या नावाखाली मराठा आरक्षणाच्या विरोधात ही नियोजनबद्ध योजना राबवली होती हे ही यातून उघड होते.

मराठा समाजाचा इतका दबाव होता की भाजप सरकारचा नाईलाज झाला. आणी संघ धोरणाच्या विरोधात जाऊन त्यांना आरक्षण देणे भाग पडले होते. मराठा आरक्षण दिले होते यात भाजपचे काडीचेही योगदान नाही. कारण सरकार वर दबाव आणणारे मराठा, उच्च न्यायालयात बाजू मांडणारे वकील मराठा, माहिती दस्त पुरवणारे मराठा, आयोगाचे अध्यक्ष मराठा आणि अगदीच स्पष्ट बोलायचे झाले तर न्यायाधीशही मराठा. यात इतर जातीच्या व्यक्तींनीही मोलाची साथ दिली. पण या सगळ्यात भाजपचे योगदान काय असेल तर ते 14 हजार मराठा आंदोलकांवर पोलीस केसेस करुन त्यांचे करीअर बरबाद करणे आणि पन्नासपेक्षा जास्त मराठा आंदोलकांचया आत्महत्या.
2014 साली आघाडी सरकारने मराठा-मुस्लिम आरक्षण जाहीर केल्या नंतर हायकोर्टात आपले पंटर पाठवून या दोन्हीही समाजाचे आरक्षण रद्दही केले. आत्ताही तेच केले आहे. सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या गोंडस नावाखाली सुप्रीम कोर्टात पाठवले आणि संकलित केलेल्या माहितीतील त्रूटी मराठा आरक्षणाविरोधात मराठा विरोधी गॅंगला पुरवल्या. शेवटी व्हायचा तो परिणाम झाला. मराठा आरक्षण रद्द झाले. केवळ जातीय द्वेष व अहंकारातून मराठाआरक्षणाचा गळा कापला भाजप पदाधिकारी असणाऱ्यानेच स्थापन केलेली सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही संघटना मराठा आरक्षणाचे हत्यारे आहेत .
असे मराठा आरक्षण समर्थकाकडुन बोलल्या जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 29
  • Today's page views: : 30
  • Total visitors : 504,593
  • Total page views: 531,351
Site Statistics
  • Today's visitors: 29
  • Today's page views: : 30
  • Total visitors : 504,593
  • Total page views: 531,351
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice