अपसरा सोनाली कुलकर्णी विवाह बंधनात.. कोण आहे तिचा होणारा नवरा ?

अपसरा सोनाली कुलकर्णी विवाह बंधनात.. कोण आहे तिचा होणारा नवरा ?

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’ या आणि अशा काही चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सोनाली विवाह बंधनात अडकली आहे. सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगताना दिसत आहेत. सोनालीने तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

सोनाली कुलकर्णी यानी Tweeet करुन ही माहीती दिली.

आम्ही जून मध्ये ukला लग्न करणार होतो कारण त्याची पूर्ण family&friends तिथे असतात.पण तिथल्या 2ndwave मुळे तारीख पुढे करावी लागली.जुलै मधली तारीख ठरली.
लग्नाच्या तयारीसाठी मी मार्च मध्ये shooting संपवून दुबईला आले,आणि भारतात 2ndwave आली
Not just मी पुन्हा एकदा दुबईत अडकले पण..
लग्न बंधनात ही!
April मध्ये UK ने Indians साठी travel ban जाहीर केला.
July पर्यंत परिस्थिती बदलणार नाही,Quarantine,travel restrictions,family साठी risk,एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च,सरकार चे नियम, याचा विचार करता आम्ही आमचा भला मोठा लग्न समारंभ cancel करायचा निर्णय घेतला.


June चं July होतंय, म्हणलं postpone करायच्या एैवजी July चं May मध्ये prepone करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ.
आम्ही आता एकत्र एका देशात आहोत,
पुढे कधी काय होईल माहीत नाही.
जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून
‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’.
आपल्या देशात अशी परिस्थिती असताना आम्ही कुठलंही celebration करूच शकत नाही
तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही
आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो.
माझं कुटुंब भारतात,कुणाल चं लंडनला,कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही.
आता Registration करून टाकू ✍🏻
२ दिवसात सगळं ठरवलं.एका तासात खरेदी,
१५ मिनी. मध्ये ४ लोकांच्या साक्षीने मंदीरात
(इथे Covid restrictions मुळे तेवढंच शक्य आहे)
वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू
(लग्नाच्या मान्यतेसाठी मंदीराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी) करून Marriage Certificate वर sign केलं ✍🏻
इथे सगळ्या process आणि paperwork मध्ये आम्हाला मदत करणारे @rahultulpule@deepalitulpule यांचे आभार🙏🏻
आमचे foster parents @sachin_narhar_joshi@shriya_joshi_sona
आणि हे सगळं घडवून आणणाऱ्या @madhaviamdekar@kolumbusim चे ही मनापासून आभार🙏🏻

पुढे….
जेव्हा, जिथे, जसं शक्य होईल,
तेव्हा, तिथे, तसं,
family & friends बरोबर सगळ्यांच्या इच्छापूर्तीसाठी सगळ्या विधी करूच.
तोवर,
आणि कायम तुमचा प्रेम आणि आशिर्वाद असूद्या 

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice