सभागृहात गोंधळ, १२ आमदार निलंबित |Misconduct in the Legislative Assembly, 12 MLAs suspended.
Online Team : सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलेले आहे. Misconduct in the Legislative Assembly, 12 MLAs suspended पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. या 12 आमदारांनी तालिका अध्यक्षांना धक्का-बुक्की करत शिवीगाळ केली, असा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला आहे.
निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली की, अशी कारवाई करू नका, मात्र त्यानंतरही १२ आमदारांवर कारवाई करण्यात आली. Misconduct in the Legislative Assembly, 12 MLAs suspended
तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन केलेल्या आमदारांच्या निलंबनाचा ठराव अनिल परब यांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आलेला आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. सभागृहात हा ठराव एकतर्फी मांडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच विरोधी पक्षाची सभागृहातील संख्या कमी करण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान, हे सर्व 12 आमदार राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहे. Misconduct in the Legislative Assembly, 12 MLAs suspended
- दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेMalpractices will not be tolerated in the 10th and 12th board exams –
- जालना जिल्हा चिखली येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला राष्ट्रीय पक्षी दिवस.National Bird Day Celebrated with Enthusiasm at PM Shri Zilla Parishad School in
- समग्र शिक्षेचा संघर्ष संपणार? मुख्यमंत्र्याचे ठोस आश्वासन, कायम आदेश लवकरच लवकरच कायम करण्याचा आदेश!Will the struggle for comprehensive education finally end? The Chief Minister gives a
- ‘समग्र शिक्षा’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी ‘स्वेच्छा मरणाची’ परवानगी मागत उपोषणाचा इशारा!“Regularise or Allow Us to Die”: Samagra Shiksha Employees Threaten Hunger Strike Till
- नराधमाचा क्रूरपणा! मालेगावच्या मानदे डोंगराळेत चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या; संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट.Malegaon Horror: 24-Year-Old Man Held for Rape-Murder of 3.5-Year-Old Girl; Demand for Death

