माती परीक्षण करूनच खरीप हंगामात पिकांची लागवड करा
शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच खरीप हंगामात पिकांची लागवड करावी. शेतकऱ्यांना राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्रच्या वतीने आवाहन.
नांदेड. ः शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरीप हंगामात पिकाची पेरणी किंवा लागवड करताना आपल्या जमिनीचे माती परीक्षण करूनच पिकाची पेरणी माती परीक्षण केंद्राच्या शिफारशीनुसार पिकास आवश्यक खताच्या मात्रा देऊनच करावी व आपल्या पिकाचे भरघोस उत्पन्न वाढावावे.
अनावश्यक खताचा खर्च टाळावा याकरिता शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनीचे मातीचे परीक्षण करूनच खरीप हंगामात पिकाची पेरणी,लागवड करावी असे आवाहन लिंगापूर ता.हदगाव येथील राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्राचे संचालक भागवत देवसरकर यांनी केले आहे. मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी जमिनीचे माती परीक्षण केले त्यांना चांगला फायदा झाला आहे.
हे ही वाचा ः
- नराधमाचा क्रूरपणा! मालेगावच्या मानदे डोंगराळेत चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या; संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट.
- माहुर पाचुंदा गावात दोन शेतकरी महिलांची निर्घृण हत्या! परिसरात खळबळ
- अमेरिकेतील न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर: झोहरान ममदानी यांच्या ऐतिहासिक विजयाची कहाणी
- मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाने खळबळ; धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, दोन अटकेत!
- वर्गखोलीत राष्ट्र घडविणारा शिक्षकच खरा राष्ट्रनायक – डॉ गोविंद नांदेडे
जमिनी मध्ये कोणत्या अन्नद्रव्याची मुलद्रव्याची व नत्र स्फुरद पालाश याची किती कमतरता आहे हे माहिती करूनच आपल्या पिकाची पेरणी करावी,जमिनीच्या मातीचे नमुने तपासणी केली तर या पिकांना व्यवस्थित खताच्या मात्रा देता येईल माती परीक्षण केंद्र यांनी केलेल्या शिफारशीनुसार खताच्या मात्रा दिल्या तर उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होईल व उत्पन्न वाढीस निश्चित मदत होईल.
शेतकरी बांधवांना सवलतीच्या दरामध्ये मातीचे परीक्षण करून त्यावर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल या संधीचा फायदा परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी बांधवांनी घ्यावा, व राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्राचे कर्मचारी महेश पाटील गोरेगावकर नंदू पाटील नरवाडे अनिल देवसरकर यांच्याशी संपर्क साधावा किंवा शेतकऱ्यांनी आपल्या मातीचे नमुने लिंगापूर येथिल माती परीक्षण केंद्रावर घेऊन यावे असे आवाहनही भागवत देवसरकर केले आहे.

