OBC’s political reservation | अ.भा.माळी महासंघातर्फेओबीसीचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्यासह इतर मागण्याचे ना.जयंत पाटील निवेदन


माहूर-प्रतिनिधी
ओबीसीचे राजकीय आरक्षण OBC’s political reservation कायम ठेवा व विविध मागण्याचे निवेदन अ.भा.माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन बेहेरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांना माहूर दौऱ्यात दिले.


मा. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय नुकताच दिला आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना असून अत्यंत दुर्दैवी निकाल आहे. त्या अनुषंगाने ओबीसी घटकांना पूर्ववत राजकीय OBC’s political reservation आरक्षण मिळवून देणे बाबत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी.

जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसीचा कॉलम नसल्यास जगणनेवर बहिष्कार टाकण्यात येईल. ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणने सोबतच सर्व जातींची जणगणना करावी, ओबीसीचे राजकीय आरक्षण त्वरीत पूर्वरत करून लोकसंख्येच्या प्रमाणात sc/st/ प्रमाणे आरक्षण द्यावे, महाज्योती चे 125 कोटी परत करून ओबीसी च्या प्रमाणात महाज्योतस निधी ध्यावा, ओबीसी समाजाच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात 1 लाख कोटीच्या निधीची तरतूद अंदाजपत्रकात करावी.

ओबीसी विद्यार्थांना शिष्यवृत्ती देऊन त्वरित जिल्हानिहाय 2(एकूण72)वसतिगृह उभारण्यात यावे.SC,ST,NT,VJNT,OBC समाजाच्या नोकरी मधील पदोन्नतीचे आरक्षण त्वरित लागू करावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.या वेळी प्रफूल्ल कऊडकर उपस्थित होते. OBC’s political reservation

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice