आरक्षणविरोधी गुणरत्न सदावर्तेंचा नांदेडमध्ये सत्कार; हॉटेल समोर तणाव, मालक व्यंकट चारीची जाहीर माफी
नांदेड: मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द करण्यात महत्वाची भूमिका बजावली म्हणून वकील सदवर्तेचा सत्कार बिपीन गद्देवार , मोहन मगरे , बालाजी गायकवाड , एजाज काकू, मोहन पासवानी, किशोर लालावाणी, सुरेश गुजारी, वजीर सिंह फौजी, सिटी प्राईडचे मालक व्यकंट चारी. नांदेड मधील व्यापारी यानी वकील सदवर्तेचा सत्कार केला. अशी बातमी स्थानीक प्रजावाणी मधे प्रकाशीत झाली.
सदरील बाब व सत्कारचा फोटो व बातमी सोशलमिडीयाच्या माध्यमातून राज्यभर पसरली असून सध्या आरक्षणावरुन महाराष्ट्र तापत असताना महाराष्ट्रास वेठीस धरून सतत मराठासमाजा विरोधी वक्तव्य करणारे सदावर्ते यांचा सत्कार करणे म्हणजे सामाजिक तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा एक प्रकारे हा प्रयत्न म्हणावा लागेल.
मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा सत्कार केल्याप्रकरणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी नांदेडमधील सिटी प्राइड हॉटेल (City Pride Hotel Nanded) समोर धरणे आंदोलन केले. त्यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या वातावरण तापलं आहे. खासदार संभाजीराजे भोसले यांनी या मुद्द्यावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. विरोधी पक्षानंही आक्रमक भूमिका घेतली आहे. हे सगळं सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी सदावर्ते यांचा सत्कार करण्यात आला. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका केली होती. तसंच, माध्यमांमधून ते सतत मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं काही लोकांनी सदावर्ते यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. मूळचे नांदेडचे असलेल्या सदावर्ते यांचा सत्कार समारंभ येथील सिटी प्राइड हॉटेलात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात सिटी प्राइड हॉटेलचे मालक व्यंकट चारी यांनी सदावर्ते यांना पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला. या सत्काराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळं संतापलेल्या मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सिटी प्राईड हॉटेलसमोर धरणे आंदोलन करत हॉटेल मालकाला धारेवर धरले. हॉटेल मालक व्यंकट चारी यांनी आंदोलकांची जाहीर माफी मागितली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हॉटेल बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
- ‘समग्र शिक्षा’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी ‘स्वेच्छा मरणाची’ परवानगी मागत उपोषणाचा इशारा!“Regularise or Allow Us to Die”: Samagra Shiksha Employees Threaten Hunger Strike Till Death नागपूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य समग्र शिक्षा
- नराधमाचा क्रूरपणा! मालेगावच्या मानदे डोंगराळेत चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या; संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट.Malegaon Horror: 24-Year-Old Man Held for Rape-Murder of 3.5-Year-Old Girl; Demand for Death Penalty Grows नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे
- माहुर पाचुंदा गावात दोन शेतकरी महिलांची निर्घृण हत्या! परिसरात खळबळwo Farmer Women Brutally Murdered in Pahuchunda Village; Local Area Stunned माहूर प्रतिनिधी :- (ज्ञानेश्वर कराळे) नांदेड, महाराष्ट्र. माहूर तालुक्यातील
- अमेरिकेतील न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर: झोहरान ममदानी यांच्या ऐतिहासिक विजयाची कहाणीZohran Mamdani Elected New York City Mayor in Historic Win; First Muslim & South Asian Leader महाराष्ट्र व्हॉइस, आंतरराष्ट्रीय डेस्क:

