महागाईचा भडका- एका सिलिंडरसाठी  हजार रुपये मोजावे लागणार आहेत

महागाईचा भडका- एका सिलिंडरसाठी  हजार रुपये मोजावे लागणार आहेत

You have to pay a thousand rupees for a cylinder

मुंबई : देशात महागाई (Inflation) उच्च स्थरावर पोहोचली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरापासून ते खाद्य तेलापर्यंत आणि अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वांंच्याच दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे.  वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये आता महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे घरगुती 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे ( gas cylinder) दर वाढवण्यात आले आहेत. घरगुती सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे. You have to pay a thousand rupees for a cylinder

पन्नास रुपयांच्या वाढीसह घरगुती सिलिंडरचे (cylinder) दर आता 999.50 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच इथून पुढे एका सिलिंडरसाठी  हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सिलिंडरचे दर महागल्याने गृहिनीचे बजेट कोलमडण्याची शक्यात आहे.  एक मे रोजी व्यवसायिक सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते. व्यवसायिक सिलिंडर पाठपाठ आता घरगुती गॅसच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे.

व्यवसायिक सिलिंडरच्या दरात वाढ

एक मे रोजी व्यवसायिक सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली होती. एक मेला व्यवसायिक सिलिंडरचे दर 104  रुपयांनी वाढवण्यात आले होते. त्यावेळी घरगुती गॅसचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा का होत नाही दिलासा मिळाला होता. मात्र आज गॅस घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची  वाढ करण्यात आल्याने आता एका गॅस सिलिंडरसाठी हजार रुपये मोजावे लागणार आहेत. गॅस दरवाढीसोबतच सीएनजी आणि पीएनजीच्या दरात देखील सातत्याने वाढ सुरूच आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

एकीकडे सीएनजी, पीएनजी आणि आता एलपीजी गॅसच्या दरात वाढ  करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात तर सातत्याने वाढ सुरूच आहे. गेल्या महिन्याभरात सीएनजीचे दर तीनदा वाढवण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे गेल्या महिन्यापासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.  22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली होती.

हे ही वाचा ======

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice