मुंबई दि. २१ पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. आधी किंमती वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा नको – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे We don’t want to raise petrol and diesel prices first and then reduce them nominally
केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता आणि आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी करदेखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आणि आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे.
आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेल्या अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे असे मुख्यमंत्री म्हणतात.
पेट्रोल आणि डिजेल वरील केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपल्या ट्वीटर संदेशात दिली. त्यानुसार पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर ६ रुपयांनी कपात केली जाणार आहे. या निर्णयामुळे दर वर्षी सरकाला सुमारे १ लाख कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावं लागणार आहे, असंही त्यांनी संदेशात म्हटलं आहे.
सर्व राज्य सरकारांना, विशेषत: ज्या राज्यांमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शेवटच्या फेरीत कपात केली गेली नव्हती, त्यांनीही अशीच कपात लागू करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं आवाहन केलं आहे.प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९ कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना १२ सिलिंडरपर्यंत प्रति गॅस सिलिंडर २०० रुपये सबसिडी दिली जाण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यामुळे वर्षाला सुमारे ६ हजार १०० कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे. देशाची आयात अवलंबित्व जास्त असलेल्या प्लास्टिक उत्पादनांसाठी सरकार कच्चा माल आणि मध्यस्थांवरील सीमाशुल्क देखील कमी करत आहे. यामुळे अंतिम उत्पादनांची किंमत कमी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
We don’t want to raise petrol and diesel prices first and then reduce them nominally
हे ही वाचा ====
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits
- Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला
- देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी