बीड प्रतिनिधी :- सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. महिन्याभरापासून ग्रामस्थ आणि कुटुंबीयांचा न्यायासाठी लढा सुरूच आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांच्यासोबत मस्साजोग गावातील काही सहकारी आहेत. भर उन्हात पाण्याच्या टाकीवर आंदोलन करणाऱ्या धनंजय देशमुख यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. To punish Santosh Deshmukh’s killers, Dhananjay Deshmukh’s protest at water tank, his health deteriorated
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्यायाची मागणी करत धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. पोलिसांकडून अद्याप ठोस कारवाई झाल्याचे दिसत नसल्याने हा तीव्र पवित्रा त्यांनी घेतला होता. धनंजय देशमुख यांनी शांततापूर्ण आंदोलन केले असून, “आम्हाला न्याय मिळत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. संतोष देशमुख यांच्या मुलगी वैभवी देशमुख यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे आणि सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
मस्साजोगवासियांचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पोलिसांनी मोबाईल टॉवरजवळ बंदोबस्त ठेवला होता. तर, धनंजय देशमुख यांच्यावरही पाळत ठेवली होती. त्यानंतर, धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देत पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन सुरू केले. धनजंय देशमुख यांच्यासोबत काही ग्रामस्थदेखील असून पाण्याच्या टाकीवर घोषणाबाजी सुरू आहे.
जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षकांच्या विनंतीवरून आंदोलन मागे
धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीने व पोलीस अधीक्षकांच्या विनंतीवरून आंदोलन मागे घेतले. मात्र, त्यांनी न्यायाची मागणी कायम ठेवली आहे.परिस्थिती गंभीर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे गावात संतापाचे वातावरण आहे. न्यायाची मागणी करताना स्थानिक नागरिकांनी आपले समर्थन व्यक्त केले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर कठोर पावले उचलून दोषींना कडक शिक्षा करावी, अशी गावकऱ्यांचीही मागणी आहे.