मोठी बातमी: शाळेची घंटा १७ ऑगस्टपासून सुरू.. शालेय विभागाकडून निर्णय जारी झाला आहे.

मोठी बातमी: शाळेची घंटा १७ ऑगस्टपासून सुरू.. शालेय विभागाकडून निर्णय जारी झाला आहे.

मुंबई(दि.१०):- राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्याची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती मिळाली होती. या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू करणारा शासन निर्णय शालेय विभागाकडून जारी झाला आहे. राज्यातील ग्रामीण भागात दि.१७ ऑगस्ट २०२१ पासून इयत्ता ५ वी ते ७ वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच, राज्यातील शहरी भागात इयत्ता ७ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. तसेच, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्याचा निर्णय संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविला आहे. The government decision to start schools in the state from August 17 was issued by the school department

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर या निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. तसेच, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची संबंधित निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागासोबत बैठक झाली आहे. १ ऑगस्ट रोजी ब्रेक द चेन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या बैठकीमध्ये उपस्थित होते.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यामध्ये ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत. राहिलेले उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. राज्यातील शाळेतील सर्व वर्ग लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. The government decision to start schools in the state from August 17 was issued by the school department

राज्यातील लॉकडाऊन पाच टप्प्यामध्ये शिथिल होत आहेत. मार्च २०२० पासून राज्यातील शाळा कोरोना महामारीमुळे बंद होत्या. कोरोनाची लाट ओसरली असल्यामुळे लवकरच शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीतीमध्ये पहिली बैठक पार पडली आहे. तसेच, १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत कॉलेज सुरू करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.The government decision to start schools in the state from August 17 was issued by the school department

===============================================================================================

<

Related posts

Leave a Comment