Online Team : ‘आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे. ५८ मूकमोर्चे काढले तरी आरक्षण मिळाले नाही. आता पुन्हा काही स्वयंघोषित नेते पुढे पुढे करीत आहेत. छावा संघटनेची पहिल्यापासूनच ठोक भूमिका राहिली आहे. संभाजीराजे यांना आमचा विरोध नाही. पण, त्यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध आहे. ते आरक्षणावर बोलत नाहीत. पण, सारथी संस्था, महामंडळाला निधी देण्याची भाषा बोलत आहेत. राजेंनी आमच्यासारखी ठोक भूमिका घ्यावी ‘मराठा आरक्षणासाठी ५८ मूकमोर्चे काढून काहीही फायदा झाला नाही. पण, समाजाचा वापर करून कोणी खासदारकी, कोणी आमदारकी तर कोणी महामंडळे मिळवून विश्वासघात केला आहे. स्वार्थी राजकारण सुरू आहे.…
Read More