भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (२६ डिसेंबर) त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. सिंग यांनी २००४ ते २०१४ या कालावधीत भारताचे १४वे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला. १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून कार्य केले, ज्यादरम्यान त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली, भारताने आर्थिक उदारीकरणाच्या दिशेने मोठी पावले उचलली, ज्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली. डॉ. सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबमधील…
Read More